बिबट्याचा हल्लामहाराष्ट्र

चितळी परिसरात मृत बिबट्या आढळला; परिसरात खळबळ

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – परिसरात आज सकाळी एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पंचनामा व तपास प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून पुढील चौकशीनंतरच अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे.

चितळी–राहता रोडलगत असलेल्या भोर हॉटेलजवळील एका शेतामध्ये सकाळच्या सुमारास काही नागरिकांना बिबट्या आढळून आला. नागरिकांनी जवळ जाऊन पाहणी केली असता सदर बिबट्या मृत अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नागरिकांनी तात्काळ दूरध्वनीद्वारे वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

दरम्यान, मृत बिबट्याचे वनविभागाच्या माध्यमातून शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतरच मृत्यूच्या कारणांचा उलगडा होईल, अशी माहिती वनरक्षक सविता थोरात यांनी दिली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!