धार्मिकमहाराष्ट्र

१ जानेवारी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर जळगाव–शिर्डी पायी दिंडीचे आयोजन; भाविक भक्तांना दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

जळगाव – सालाबादप्रमाणे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ७ वाजता श्री क्षेत्र जळगाव येथून श्री क्षेत्र शिर्डीपर्यंत भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन जळगाव ग्रामस्थ व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. नववर्षाची सुरुवात साईभक्ती, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेत व्हावी, या भावनेतून हा दिंडी सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो.

 

दिंडीचे प्रस्थान महादेव मंदिर, जळगाव येथून सकाळी ७ वाजता होणार असून, साईनामाच्या जयघोषात संपूर्ण मार्ग भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. दिंडीचे विशेष आकर्षण म्हणून साईरथ, सुवाद्य साऊंड सिस्टीम, तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी ट्रॅक्टरची सोयीस्कर व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळच्या चहा व नाश्त्याच्या सेवेसाठी विलास पोपट चौधरी जळगाव, भगवान किसन शेळके शेळके वस्ती, अरुण रामराव गाढवे एकरूखे, अष्टविनायक मिल्क जळगाव, अनिता शंकरराव चौधरी शिर्डी येथील अक्षय राजेंद्र राशीनकर व राहुल राजेंद्र राशीनकर, साऊंड सेवा पंकज चौधरी व विवेंद्र गोसावी तसेच पाणी पाऊच सेवेसाठी शाम चौधरी व निखिल चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.

तसेच, दिंडीत सहभागी होणाऱ्या साईभक्तांसाठी आयोजकांच्या वतीने चहा, नाश्ता व दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. या भक्तिमय पायी दिंडी सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने साईभक्तांनी सहभागी होऊन नववर्षाची सुरुवात साईकृपेच्या सान्निध्यात करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!