क्रीडामहाराष्ट्र

कबड्डी क्षेत्रातील योगदानाबद्दल गणेशचे संचालक संपतराव चौधरी यांचा ‘कबड्डी महर्षी’ पुरस्काराने सन्मान

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशन तसेच संघर्ष स्पोर्ट्स क्लब, चितळी यांच्या संयुक्त विद्यमाने चितळी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य खुल्या 60 किलो वजनगटातील एकदिवसीय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संघर्ष स्पोर्ट्स क्लब चितळी–जळगाव संघाने उत्कृष्ट खेळ सादर करत विजेतेपद पटकावले. दिवंगत नाथाजी चौधरी पाटील यांच्या स्मरणार्थ 21 हजार रुपयांचे पारितोषिक श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी यांच्या वतीने प्रदान करण्यात आले.

याच कार्यक्रमात कबड्डी क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी यांना अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘कबड्डी महर्षी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. छावा ब्रिगेडचे संस्थापक विश्वनाथ वाघ तसेच आरपीआयचे उपजिल्हाध्यक्ष योगेश बनसोडे यांच्या हस्ते हा पुरस्कार संपतराव चौधरी यांना प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी, निवृत्त पोलीस अधिकारी शंकरराव चौधरी, चितळीचे सरपंच नारायणराव कदम, महेंद्र चौधरी, सोना पगारे, दीपक वाघ, सोपान वाघ, गोपीनाथ चव्हाण, रुपेश गायकवाड, प्रकाश आरणे, बाबासाहेब वाघ, कृष्णा सायबोळ, तौफक कुरेशी, दत्तू राशीनकर, डॉ. गोरक्षनाथ चौधरी, माजी उपसरपंच कल्पनाताई चौधरी यांच्यासह चितळी–जळगाव परिसरातील अनेक मान्यवर व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!