क्रीडामहाराष्ट्र

चितळी-जळगाव ग्रामस्थांच्यावतीने भव्य खुल्या 60 किलो एकदिवसीय कबड्डी स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

कब्बड्डी स्पर्धेत चितळी–जळगावच्या संघर्ष स्पोर्ट्स क्लबचा विजय; दिवंगत नाथाजी चौधरी पाटील स्मृतिप्रीत्यर्थ २१ हजारांचे प्रथम पारितोषिक प्रदान!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – अहिल्यानगर जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशन तसेच संघर्ष स्पोर्ट्स क्लब, चितळी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य खुल्या 60 किलो वजन गटातील एकदिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन शनिवार, दिनांक 27 डिसेंबर रोजी चितळी महाविद्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले. स्पर्धेचे हे प्रथमच वर्ष असतानाही तब्बल 32 संघांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.चितळी–जळगाव परिसरातील ग्रामस्थांसह कबड्डीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून टाळ्या व शिट्ट्यांच्या कडकडाटात खेळाडूंना प्रोत्साहन दिले. अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतील एकूण 32 नामवंत संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. चुरशीच्या प्राथमिक सामन्यांनंतर 16 संघांची उपांत्य फेरीसाठी निवड करण्यात आली.

 

या स्पर्धेत संघर्ष स्पोर्ट्स क्लब चितळी, जळगाव ओन्ली साई संघ, टाकळीभान जय हिंद संघ, श्रीरामपूर पाथरवाला संघ, भोकर आजाद संघ, टाकळीभान आर.बी.एन.बी. महाविद्यालय संघ, श्रीरामपूर बारामती स्पोर्ट्स संघ, नांदूर खंडाळा स्पोर्ट्स क्लब, भारतीयम संघ उंदीरगाव, जय बजरंग संघ रामपूर, योग स्पोर्ट्स क्लब अहिल्यानगर यांच्यासह अनेक संघांनी सहभाग नोंदवून स्पर्धेची रंगत वाढवली.

प्रत्येक सामन्यातील खेळाडूंची ताकद, चपळता व खिलाडूवृत्ती प्रेक्षकांची मने जिंकून गेली.स्पर्धेवेळी हरियाणा स्टीलर्सचे शिवम पटारे, यू मुंबा संघाचे सौरभ राऊत, तेलुगू टायटन्सचे अजित पवार यांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला. तसेच अनिल पटारे सर, भास्करराव ताके, मंजिनाथ वाघ, दिलीपराव चौधरी आणि शंकरराव चौधरी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. क्रीडा मार्गदर्शक रवी गाडे, सचिन गायकवाड, सचिन कांबळे, पोटे सर, दुधाने सर यांनी स्पर्धेतील पंच म्हनुन काम पाहिले.

संघर्ष स्पोर्ट्स क्लब चितळी–जळगाव संघाने अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळ सादर करत दिवंगत नाथाजी चौधरी पाटील यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक 21 हजार रुपये पटकावले. हे पारितोषिक श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी यांच्या वतीने प्रदान करण्यात आले.द्वितीय पारितोषिक 15 हजार रुपये टाकळीभान ओन्ली साई संघास कै. भागवत चौधरी पाटील यांच्या स्मरणार्थ शंकरराव चौधरी यांच्या वतीने देण्यात आले.

 

तृतीय पारितोषिक 11 हजार रुपये जय हिंद स्पोर्ट्स क्लब, श्रीरामपूर संघास चितळीचे लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम तसेच स्कूल कमिटी सदस्य दीपकराव वाघ यांच्या वतीने प्रदान करण्यात आले.चतुर्थ पारितोषिक 7 हजार रुपये पाथरवाला संघ, भोकर यांना व्यावसायिक बिलाल कुरेशी यांच्या वतीने देण्यात आले.स्पर्धेतील सर्व पारितोषिके रोख स्वरूपात प्रदान करण्यात आली. गोंडेगाव येथील शुभम फोपसे याने पाच गुणांची कमाई करत उत्कृष्ट खेळी सादर केली, तर बारामती येथील ओमकार देवकाते याचा ‘बेस्ट डिफेंडर’ म्हणून सन्मान करण्यात आला.

याशिवाय 2001 रुपये रकमेचे वैयक्तिक पुरस्कार देण्यात आले. बेस्ट रेडर पुरस्कार उपसरपंच दिलीपराव चौधरी यांच्या वतीने, बेस्ट ऑलराऊंडर पुरस्कार डॉ. सुजयदादा विखे पाटील युवा मंचचे संस्थापक शैलेश वाघ यांच्या वतीने,.या स्पर्धेसाठी ट्रॉफीचे सौजन्य छावा संघटनेचे संस्थापक विश्वनाथ वाघ यांनी केले. पाणी सौजन्य दिलीप ठावरे, प्रकाश व्यवस्थेचे आयुब शेख, जेवणाचे सौजन्य सलीम कुरेशी तर मंडप व्यवस्थेचे सौजन्य बिलाल कुरेशी यांनी केले.

स्पर्धेदरम्यान कबड्डी क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल ‘कबड्डी महर्षी’ पुरस्काराने श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी यांना सन्मानित करण्यात आले.

निवृत्त पोलीस अधिकारी शंकरराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी, संचालक संपतराव चौधरी, उपसरपंच दिलीपराव चौधरी, निवृत्त पोलीस अधिकारी शंकरराव चौधरी,चितळीचे सरपंच नारायणराव कदम,छावा संघटनेचे संस्थापक विश्वनाथ वाघ, आरपीआयचे उपजिल्हाध्यक्ष योगेश बनसोडे, महेंद्र चौधरी, सोना पगारे, दीपक वाघ, सोपान वाघ, गोपीनाथ चव्हाण, रुपेश गायकवाड,प्रकाश आरणे, बाबासाहेब वाघ, कृष्णा सायबोळ, तौफक कुरेशी, दत्तू राशीनकर,डॉ. गोरक्षनाथ चौधरी, माजी उपसरपंच कल्पनाताई चौधरी यांच्यासह चितळी-जळगाव परिसरातील अनेक मान्यवर व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चितळी महाविद्यालयाचे प्राचार्य नामदेव शिरसाठ क्रीडा शिक्षक अरुण झुराळे व सर्व शिक्षकांचे सहकार्यही या स्पर्धेस लाभले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!