धार्मिक

गणेश कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी यांच्या 77व्या अभिष्टचिंतनानिमित्त उद्या जळगावात ह.भ.प. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ख्याती असलेल्या जळगावचे माजी सरपंच तसेच श्री गणेश सहकारी साखर कारखाना लिमिटेड, गणेशनगरचे विद्यमान संचालक संपतराव नाथाजी चौधरी पाटील यांच्या ७७ व्या  अभिष्टचिंतनाचा सोहळा उद्या मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.

अभिष्टचिंतनानिमित्त शुक्रवार, दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे जाहीर हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

 

हा अभिष्टचिंतन उत्सव जळगाव येथील महादेव मंदिरासमोरील अष्टविनायक मिल्क येथे पार पडणार असून, यानिमित्त राजकीय, सहकार, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा देणार आहेत.या हरिकीर्तनाचा लाभ जळगाव पंचक्रोशीतील तसेच परिसरातील सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन समस्त जळगाव ग्रामस्थ,अभिष्टचिंतन महोत्सव समिती आणि समस्त चौधरी पाटील परिवार यांनी केले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!