
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे गटनिहाय आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून, पुणतांबा जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी (अनु.जा.) राखीव ठरविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, या गटातून रामपूरवाडी (ता. राहाता) येथील सरपंच संदीप सुरडकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
सुरडकर हे कोल्हे गटाचे अत्यंत विश्वासू, परिपूर्ण शिलेदार म्हणून ओळखले जातात. युवा नेते विवेक कोल्हे यांचे मार्गदर्शन ते सातत्याने घेत असून, गटशक्ती मजबूत करण्यासाठी आणि ग्रामीण भागात विकास साधण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात विविध विकासकामांची अंमलबजावणी, ग्रामस्थांशी थेट संवाद आणि पारदर्शक प्रशासन ही त्यांची कार्यशैली ठरली आहे. यामुळे त्यांना स्थानिक नागरिकांचा आणि विशेषतः तरुण वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत आहे.युवकांना सोबत घेऊन विकास साधण्यासाठी मी सदैव कटीबद्ध आहे, असे सुरडकर यांचे म्हणणे असून, त्यांचा हा निर्धार तरुणांमध्ये प्रेरणादायी ठरत आहे.
पुणतांबा गट आरक्षण सोडतीनंतर संदीप सुरडकर यांच्या नावाची चर्चा अधिक गती घेत आहे. या घडामोडींमुळे राहाता तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, कोल्हे गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकृत उमेदवार जाहीर होईपर्यंत या चर्चांना आणखी उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




