कृषीमहाराष्ट्रसामाजिक

जय योगेश्वर दुध संकलन केंद्राकडुन दिवाळी निमित्त लाभांश वाटप; दुध उत्पादकांची दिवाळी झाली गोड

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

राहाता- तालुक्यातील जळगाव येथील जय योगेश्वर दुध संकलन केंद्राकडुन समस्त दुध उत्पादक शेतकरी व सभासदांना यावर्षी प्रतिलिटर पन्नास पैसे बोनस देण्याचे जाहीर केले असून दिवाळी सणाच्या निमित्ताने अनामत व बोनससह दीड रुपया प्रति लिटर प्रमाणे सभासदांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन अनिताताई चौधरी यांनी दिली.

 

 

2024-25 आर्थिक वर्षात संस्थेने मोठी उन्नती साधली असुन सर्व सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेली आहे.दिवाळी निमित्त पेमेंट वेळेवर देण्याचे आश्वासन देवून शेतकऱ्यांच्या प्रती आपुलकीची भावना जपून अतिशय हितकारक निर्णय घेतल्याने सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी होणार आहे.यावर्षी अनामत व बोनस,कर्मचारी पेमेंट,कर्मचारी बोनस पोटी ६३ लाख २७ हजार रुपये संस्थेकडुन सभासदांच्या बँक खात्यावर नुकतेच वर्ग करण्यात आले आहेत सर्व सभासदांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.याप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक गंगाधर चौधरी, गणेश कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी यांच्या हस्ते संस्थेला वर्षभर नियमित दुध पुरवठा करणाऱ्या प्रथम पाच उत्पादकांचा भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला उर्वरीत उत्पादकांना ही भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

 

जय योगेश्वर दुध संस्थेकडून ग्रामीण भागातील दूध उत्पादक सभासद यांना बोनस देण्याची परंपरा अविरत सुरु ठेवली आहे.यापूर्वीही संस्थेने नियमित बोनस दिलेला आहे.दिवाळीपूर्वी उत्पादकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधानाचे हास्य फुलवणारा हा निर्णय घेतला असुन संस्थेने दुध उत्पादक सभासदांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेट दिली आहे.परिसरात असे स्तुत्त्यपूर्ण उपक्रम राबवणारी एकमेव संस्था ठरली असल्याचे प्रतिपादन केशव प्रोसेसर्सचे संचालक केशवकुमार काळे यांनी केले.संस्था दुधाला योग्य दर, गुणवत्ता व दुध उत्पादक सभासदांचे हित जोपासण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहे.संस्थेने दुध उत्पादक सभासदांना बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँक तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून संस्थास्तरावर आर्थिक सहाय्य करून पंचक्रोशीतील तरुण दुध उत्पादकांना प्रोत्साहन देण्याचे कामं केलेलं आहे.आगामी काळातही जय योगेश्वर दुध संकलन संस्थेकडून सभासदांच्या हिताचे विविध निर्णय घेण्यात येणार आहेत असे चेअरमन अनिताताई चौधरी यांनी माहिती देताना सांगितले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!