
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी –लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कृष्णजन्माष्टमी उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी कृष्ण जीवनावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, श्री. विजय आहेर आदीसह विद्यालयाच्या प्राचार्या सौ. रेखा रत्नपारखी यांचे उपस्थितीत बालकृष्ण प्रतिमा पूजन व दहीहंडी पूजन झाले.
बालकृष्ण व राधा यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांशी डॉ. प्रदीप दिघे व सौ.लीलावती सरोदे आदींनी विद्यार्थ्याशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या मनोऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर गोपाळकाल्याचा प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




