धार्मिक

लोणी खुर्द येथे दक्षिणमुखी श्री.हनुमान मंदिर जिर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

सरपंच जनार्धन घोगरे यांची माहिती:भव्य दिव्य सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

 

लोणी खुर्द – भक्तांच्या निष्ठा व ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारलेले व नव्याने जिर्णोद्धार केलेले श्री हनुमान मंदिर आता नव्या तेजाने उजळणार आहे. या पवित्र स्थळी श्री दक्षिणमुखी मारुतीरायांची नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत असून, त्यानिमित्ताने भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 

सोहळ्याचा शुभारंभ मंगळवार १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता श्री मारुती रायांची मूर्तीची भव्य मिरवणूक काढून होणार आहे. बुधवार १३ ऑगस्ट रोजी प्रांत पूजा, मंदिर वास्तू पूजा व धार्मिक विधी पार पडतील. मुख्य प्राणप्रतिष्ठा व स्थापना महोत्सव गुरुवार १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता संपन्न होणार असून, यावेळी रामायणाचार्य, विदर्भरत्न ह.भ.प. रामराव महाराज ढोक (नागपूरकर) यांचे कीर्तन होणार आहे.मिरवणुकीत मारुती रायांची मूर्ती,पारंपरिक ढोल-ताशा, भजनी मंडळांचा सहभाग असेल. प्राणप्रतिष्ठा दिनी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.

 

“हा सोहळा संपूर्ण गावासाठी अभिमानाचा, श्रद्धेचा आणि भक्तीमय वातावरणाचा अविस्मरणीय क्षण आहे,” असे सरपंच जनार्दन घोगरे पाटील यांनी सांगितले. त्यांनी सर्व लोणी खुर्द व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला भगिनी, युवक व भाविकांना या दिव्य सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!