Uncategorized

राहाता तालुक्यातील जळगाव येथे शिवप्रेमींचा जल्लोष; १२ किल्ल्यांना युनेस्कोकडून मान्यता मिळाल्याने पेढे वाटून आनंद साजरा

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना वीस देशांच्या पाठिंब्यासह युनेस्को संस्थेकडून जागतिक पातळीरील वारसाचे मानांकन बहाल केल्याबद्दल राहाता तालुक्यातील जळगाव येथे समस्त शिवप्रेमी व ग्रामस्थांच्या वतीने फलकाचे अनावरण करून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.

या प्रसंगी श्री.महादेव मंदिराच्या परिसरात पेढे वाटून निर्णयाचे स्वागत करत ग्रामस्थांनी मोठा आनंद उत्सव साजरा केला ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व ग्रामस्थांनी विशेष आभार मानले आहे.छत्रपती शिवरायांचा जय घोष करत त्यांना मानवंदना करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्य दैवत असून शिवनेरी, राजगड, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, रायगड हे महाराष्ट्रातील तर तामिळनाडूमधील जिंजी या किल्ल्याची यामध्ये निवड झाली असून सर्व गड किल्ले महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यांचे संवर्धन होणे काळाची गरज होती यामुळे शिवरायांचा विशेष सन्मान झाला असून सांस्कृतिक वारसा जपण्यात शासनाला यश आलेले आहे राज्यात पर्यटनाला मोठी चालना मिळणार असूनराज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे जागतिक पातळीवर छत्रपती शिवरायांचा इतिहास स्वर्ण अक्षराने लिहिला जाणार असून राज्यातील ऐतिहासिक १२ गडकिल्ल्यांचे संवर्धन होवून त्या वास्तूंचे जतन होणार आहे राज्यशासनाने गडकिल्ल्यांच्या बाबत आजवर घेतलेले निर्णय अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवद्वार ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी यांनी काढले.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी,गणेशचे संचालक संपतराव चौधरी,अप्पासाहेब चौधरी, आबासाहेब चौधरी, जगन्नाथ चौधरी एकनाथ निर्मळ, मधुकर शिंदे बाळासाहेब चौधरी, भास्कर चौधरी, मेजर शिंदे,खडूं वाघ,दत्तात्रय चौधरी, भागवत चौधरी, मछिंद्र चौधरी,दिलीप चौधरी,भास्कर चौधरी रमेश चौधरी,भीमराज वाणी, रमेश वाबळे,अण्णासाहेब चौधरी, भागवत वाघ, ज्ञानदेव वैदय,भाऊ शिंनरकर,संजय चौधरी, चंद्रकांत चौधरी,बाबा गायकवाड,सचिन चौधरी, बाळासाहेब शेलार,संतोष साळुंके, विकी वाघ,बाबासाहेब चौधरी, आदींसह पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!