Uncategorized

डॉ.विखे पाटील कृषि महाविद्यालय,विळद घाट यांच्यातर्फे शेतकरी चर्चासत्राचे आयोजन; तज्ज्ञांचे बहुमूल्य मार्गदर्शन

साकत खुर्द येथे खरीप हंगाम मार्गदर्शनासाठी शेतकरी चर्चासत्र उत्साहात संपन्न

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर  –अहिल्यानगर तालुक्यातील साकत खुर्द येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कृषि महाविद्यालय, विळद घाटतर्फे ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत शेतकरी चर्चासत्राचे आयोजन दिनांक ३० जून २०२५ रोजी हनुमान मंदिर, साकत खुर्द (ता. व जिल्हा – अहिल्यानगर) येथे करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद गावच्या उपसरपंच मा. सौ. मीना बाबासाहेब चितळकर यांनी भूषवले. प्रमुख व्याख्याते म्हणून मा. श्री. बाळासाहेब काकडे (उपकृषी अधिकारी, पाथर्डी), श्री. वसंत भोईटे (सहाय्यक कृषी अधिकारी, साकत खुर्द), डॉ. डी. पी. मावळे (सहाय्यक प्राध्यापिका, कृषि महाविद्यालय विळद घाट) तसेच विशाल कंपनीचे प्रतिनिधी श्री. सचिन चिलघर उपस्थित होते.

 

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. नारायण करांडे (मंडळ कृषि अधिकारी, वाळकी), कृषि महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक प्रा. के. एस. दांगडे तसेच गावातील प्रगतिशील शेतकरी – श्री. दत्तु चितळकर, यादव वाघमोडे, जितेंद्र कारले, गणेश जाधव, बाबासाहेब चितळकर, भीमा शिंदे, संपत वाघमोडे, रामदास चितळकर, तात्याभाऊ वाघमोडे, भरत वाघमोडे, केरभाऊ वाघमोडे, उद्धव शिंदे, सुभाष चितळकर, राहुल शिंदे – आणि गावातील अन्य शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना उपकृषी अधिकारी श्री. बाळासाहेब काकडे यांनी कांदा बीज उत्पादनविषयी सखोल माहिती दिली व विविध शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन केले. सहाय्यक कृषी अधिकारी श्री. वसंत भोईटे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. डॉ. डी. पी. मावळे यांनी मृदा व जलसंधारणाचे शाश्वत शेतीतील योगदान स्पष्ट केले, तर मंडळ कृषी अधिकारी मा. श्री. नारायण करांडे यांनी जैविक शेतीचे महत्त्व पटवून दिले.

 

या कार्यक्रमासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, विळद घाट (अहिल्यानगर) चे संचालक (तांत्रिक) प्रा. सुनील कल्लापुरे आणि कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमेश्वर राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के. एस. दांगडे यांनी केले. सूत्रसंचालन कृषिकन्या कु. श्वेता टकले यांनी केले. आभार प्रदर्शन गावचे प्रगतिशील शेतकरी श्री. दत्तु चितळकर यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषिकन्या कु. अनुराधा चोभे, शुभांगी मोहिते, प्रिया नऱ्हे, शिवानी नन्नवरे आणि शालोम साळवे यांनी मेहनत घेतली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!