
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ग्रंथ – वृक्षदिंडीसह भव्य रिंगण सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते विद्यार्थिनींनी वृक्षदिंडीत ग्रंथ डोक्यावर घेवून थोर विभूतींचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले वृक्षदिंडीच्या माध्यमातून ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा सामाजिक संदेश देण्यात आला.

यावेळी महाविद्यालयातील समस्त विद्यार्थ्यांनी कार्डबोर्ड पासून विठ्ठलाच्या पालखीची निर्मिती केली फुलांच्या माळाने सजविण्यात आली रीतीरिवाजाप्रमाणे पालखीत विठ्ठल व रुक्मिणीची मूर्ती विराजमान करण्यात आली विद्यार्थी विठ्ठलाची पालखी खांद्यावर घेऊन निघाले होते.विठूरायाच्या पालखीच्या पुढे विद्यार्थिनी ग्रंथासह तुलसी वृंदावन डोक्यावर घेत सहभाग नोंदवला.

यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या पेहरावात वृक्ष व ग्रंथ हाती घेऊन ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी वारकऱ्यांची वेशभूषा साकारून हाती भगवे ध्वज घेत वृक्षदिंडीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.सर्वत्र महाविद्यालयाच्या प्रांगणात हरिनामाचा गजर होता सुरु होता विद्यार्थी व शिक्षकांची फुगडी प्रमुख आकर्षण ठरली यावेळी चितळी शाळेमध्ये पंढरपुरातील खराखुरा वाळवंट अवतरल्याचे चित्र दिसत होते.

यावेळी दैदीप्यमान रिंगण सोहळ्यात ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

शाळेचे संपूर्ण वातावरण भक्तीमय झालेले पाहायला मिळाले.आषाढी एकादशी निमित्त आयोजित वृक्षदिंडी सोहळ्याच्या निमित्ताने विद्यार्थी व शिक्षकांच्या हस्ते शाळेच्या परिसरात विविध ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले. चितळी-जळगाव परिसरातील ग्रामस्थांसह पालकांनी वृक्षदिंडीचे कौतुक केले.प्राचार्य नामदेव शिरसाठ पर्यवेक्षिका अनिता सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी रिंगण सोहळ्याचे संयोजन क्रीडाशिक्षक अरुण झुराळे श्रद्धा पाटील यांनी केले यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




