प्रवरा शिक्षण संस्था

प्रवरेच्या गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयाचा तृतीय वर्षाचा ९७ टक्के निकाल!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय, लोणी या महाविद्यालयाच्या बी एससी कॉम्प्युटर ऍप्लिकेशन विभागाचा तृतीय वर्षाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे मार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल २०२५ परीक्षेचा निकाल ९७ टक्के लागला . 

 

यामध्ये चैताली सतीश नानेकर आणि साक्षी अशोक बोठे यांनी ९.५३ सीजीपीए मिळवून प्रथम क्रमांक सारिका संजय जाधव हिला ९.३८ आणि कु. थोरात श्रद्धा नानासाहेब ९.२६ सिजिपीए मिळवून द्वितीय तर तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या अशी माहिती प्राचार्य डॉ अनुश्री खैरे यांनी दिली. विभाग प्रमुख डॉ. संजय वाणी, डॉ. राजश्री तांबे, डॉ .सुरेखा काळे, प्रा. अर्चना घोगरे, प्रा . गोंधळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.  

 

 या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, डाॅ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे पाटील तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!