गुन्हेगारीमहाराष्ट्र

शेवगावमध्ये पोलिसांची धडक कारवाई;सुमारे चार लाखांचा सुगंधित तंबाखू व मावा जप्त,पाच जणांवर गुन्हा दाखल

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

अहिल्यानगर – जिल्ह्यात अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष पोलिस पथक तयार करण्यात आले असून, या पथकाने शेवगाव शहरात मोठी कारवाई केली. दिनांक १७ जून रोजी रात्री १०.३० वाजता पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही व्यक्ती आपल्या घरी गिरणीच्या सहाय्याने सुगंधित तंबाखू मिसळून मावा तयार करत असल्याचे निष्पन्न झाले.

 

त्यानंतर तातडीने पंचासह विशेष पथकासह संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी खलील नबिब शहा, अल्ताफ पठाण (दोघे रा. नाईकवाडी मोहल्ला, जामा मशीद), कुणाल संजय पिसाळ (रा. भगतसिंग चौक), शहाबाज ताहेर खान पठाण व आफताब ताहेर खान पठाण (दोघे रा. बंधन लॉन्स, शेवगाव) यांच्या घरातून मावा तयार करण्याचे साहित्य, गिरणी व सुगंधित तंबाखू असा एकूण ३,९८,६००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

या पाचही आरोपींविरुद्ध प्रशांत चंद्रकांत आंधळे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५३९/२०२५ भारतीय न्यायसंहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

 

संपूर्ण कारवाई पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ भिंगारदिवे, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनील पवार, अजय साठे, अमोल कांबळे, अक्षय भोसले, सुनील दिघे तसेच शेवगाव पोलीस ठाण्याचे पोसई खेडकर, आकाश चव्हाण, शिरसाठ, अंगरखे यांच्या पथकाने केली. पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,जिल्ह्यात अशा अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असून, माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!