प्रवरा शिक्षण संस्थालोणी

प्रवरा पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल; विज्ञान शाखेत पुन्हा एकदा विक्रमी यशाची परंपरा कायम!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

लोणी – लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज,प्रवरानगरच्या विज्ञान शाखेचा सलग अठरा वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. बारावी बोर्ड परीक्षा २०२५ मध्ये एकूण ७४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यामध्ये ४ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व उर्वरित १५ विद्यार्थी द्वितीय श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले. अशी माहीती प्राचार्य डाॅ.बी.बी. अंबाडे यांनी दिली.

यामध्ये -सरोदे माहेश्वरी गोविंद सरोदे- ८७.१७ टक्के गुण मिळून प्रथम, अर्ष अस्लम अहमद शेख ८४.१७ टक्के गुण मिळून व्दितीय तर आदित्य प्रविण रोकडे – ७७.६७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रंमाक मिळविला. 

सर्व उत्तीर्ण विदयार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, डॉ. प्रदीप दिघे सर आणि संचालिका लीलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे. 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!