महाराष्ट्रराजकीयलोणी

लोणी बाजारतळावर ऐतिहासिक सोहळा – सहकार जनक डॉ. विठ्ठलराव व लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण तसेच पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण सोहळ्याचे आयोजन रविवारी (दि. ५ ऑक्टोबर) लोणी बाजारतळ येथे करण्यात आले आहे.

या ऐतिहासिक समारंभाचे उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या शुभहस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.रविवार दुपारी बरोबर १२ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लोणी परिसरात उत्साहाचे वातावरण असून, सहकार क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी व हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत.

 

यावेळी मंत्री मा.श्री. मुरलीधर मोहोळ, आ. श्री. रविंद्र चव्हाण, मा. श्री. राम शिंदे, मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, मा. श्री. रामदास आठवले, मा. पंकजाताई मुंडे, मा. श्री. बाबासाहेब पाटील, मा. श्री. पंकज भोयर, मा. मा. श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील, मा. आ. श्री. शिवाजीराव कर्डीले, मा. भा. श्रीमती मोनीकाताई राजळे, मा. भा. श्री. संग्राम जगताप, मा. आ. श्री. आशुतोष काळे, मा. आ. श्री. किरन लहामटे, मा. आ. श्री. काशिनाथ रदाते, मा. आ. श्री. विक्रम पाचपुते, मा. आ. श्री. विठ्ठलराव लंघे, मा. आ. श्री. अमोल खताळ, मा. श्री. पांडुरंग पाटील, मा. श्री. प्रवीण दराडे, मा. श्री. दिपक तावरे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!