Uncategorized

जळगाव – शेळकेवस्ती रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष?

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव – शेळकेवस्ती रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात गेला आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणाऱ्या साईडगटारीत बहुतांश काटेरी झुडपे वाढले आहे.वाहन चालकांना समोरून काय येतंय याचा अंदाज येत नाही अश्या स्थितीत अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देवून रस्त्याच्या साईडगटारीत वाढलेल्या अनावश्यक झाडं झुडपांना हटविण्याची मागणी नारिकांनी केली आहे.

जळगाव-शेळकेवस्ती रस्ता काटेरी झुडपांच्या मागे लपला आहे दुचाकी चार चाकी वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो रात्रीच्या वेळी समोरच्या वाहणाचा अंदाज येत नाही.वाहन चालकांचे प्रचंड हाल होतात सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित रस्त्याची अद्याप पर्यंत देखभाल का केली नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याबाबतच्या अडचणी अध्यापही समजुन घेतल्या नाही.

या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.सध्याला पावसाळा सुरु असून काटेरी झुडपे रस्त्यावर झुकलेले पाहायला मिळत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित रस्त्यावरील साईडगटारीत वाढलेले काटवणाचे झूडपे उन्हाळ्यात तोडणे आवश्यक होते परंतु; याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे रस्त्यावर काही अपघात घडल्यास कोणाची जबाबदारी राहील असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.रस्त्यावरील काटेरी झुडपं वाहनचालकांना खुप त्रासदायक ठरत आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमधुन सध्याला तीव्र नाराजगीचा सुर उमटत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या तक्रारीकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्यावर आलेल्या अनावश्यक झुडपांना कट करून रस्त्याचा श्वास मोठा करावा अशी नागरिकांची मागणी होत आहे.

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!