
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
अहिल्यानगर – स्नेहालयाच्या ‘रेडिओ नगर ९०.४’ एफएम’ने स्नेहीजनांच्या शुभेच्छांच्या वर्षावात व मोठ्या उत्साही वातावरणात नुकतेच पंधराव्या वर्षात पदार्पण केले.
रेडिओशी संबंधित विविध व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.स्नेहालयचे विश्वस्त राजीव गुजर, संचालक हनिफ शेख, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, प्रतिसाद केंद्राचे अजय वाबळे, संतोष धर्माधिकारी, सुहासभाई मुळे आदी यावेळी उपस्थित होते. रेडिओ स्टेशन हेड संदीप क्षीरसागर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
हे फक्त रेडिओ स्टेशन नसून,समाजाशी नाते जोडणारा दुवा आहे, असे सांगून मान्यवरांनी चौदा वर्षांच्या वाटचालीचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सूत्रसंचालन आरजे चिन्मयीने केले, तर आभार अंशुल सब्बन यांनी मानले.कार्यक्रमासाठी आरजे कोमल, आरजे अनुजा मुळे, सीमा गंगावणे, पूजा महानुर,ज्योती राणा, जयश्री शिंदे, यांनी विशेष मेहनत घेतली.
