प्रवरा शिक्षण संस्था

लोणीच्या विखे पाटील पॉलिटेक्निकच्या १४७ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकच्या १४७ विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये शिक्षण पुर्ण होण्यापुर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या वर्षभरात पॉलिटेक्निकच्या विविध अभ्यासक्रमातील शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीमार्फत निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. व्ही. आर. राठी यांनी दिली.  

घारडा केमिकल्स लिमिटेड लोटे परशुराम, जि. रत्नागिरी, जीएमसीसी एम आयडीया, सुपा, बजाज ऑटो लिमिटेड, चाकण, आयएफबी रांजणगाव, विटगेन ग्रुप दौंड, किर्लोस्कर न्युमॅटीक्स हडपसर पुणे, बॉश चासिस चाकण, धूत ट्रान्समिशन, पुणे, सोपण ग्रुप पुणे, लक्ष्मि कन्स्ट्रक्शन्स, कोल्हापूर, एक्साईड बॅटरी अहिल्यानगर, सन फार्मा, सिप्ला फार्मास्युटिकल्स, कुरकुंभ, रिलायन्स इंडस्ट्रीजलि, पाताळगंगा, एपिटोम कॉम्पोनंट्स लि, सुपा, पीजी टेक्नोप्लास्ट सुपा अशा विविध १६ कंपन्यांमधून विखे पाटील पॉलिटेक्निकच्या १४७ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक कंपन्यांचे अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती दरम्यान ग्रामीण भागातील या विखे पाटील पॉलिटेक्निकचे विद्यार्थी कुठेही कमी पडत नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले. 

 

संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कल्पक नेतृत्वामुळे विविध कंपन्याबरोबरच्या शैक्षणिक करारानुसार परिसर मुलाखतींसाठी बहुराष्ट्रीय कंपन्याचा मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विदयार्थ्यांचाही सहभाग व प्रोत्साहन मिळत असल्याने विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी यशस्वी प्रयत्न होत असल्याचे विखे पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. व्ही.आर. राठी यांनी सांगितले.मुलाखतीसाठी समन्वयक प्रा. मनोज परजणे, ट्रेनिंग प्लेसमेंट आधिकारी प्रा. राजेंद्र निंबाळकर, विभाग प्रमुख व सर्व विभागातील प्लेसमेंट समन्वयक यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता निर्माण होण्यासाठी कंपन्यांच्या प्रतिनिधींमार्फत विद्यार्थ्यांसाठी कम्युनिकेशन स्किल, सॉफ्ट स्किल, उद्योजकता विकास, व्यक्तिमत्व विकास, इनप्लांट ट्रेनिंग, संभाषण कौशल्य, मुलाखतीचे तंत्र या बाबत प्रशिक्षण घेण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील इंडो जर्मन टूल कंपनीतर्फे उद्योजकता या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. आर्डिनो प्रोग्रामिंग, सेन्सर्स इंटरफेसींग या तंत्राच्या उपयोगीतेबाबत अँम्ब्स सी-डीएसपी छत्रपती संभाजीनगर या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळाले. इंटर्नशीपसाठी विविध कंपन्यांमार्फत विद्यार्थ्यांना (स्टायपेंड) पेमेंट देखील देण्यात येत असल्याने पालक व विद्यार्थीवर्गात आनंद व्यक्त होत आहे.  

 

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. व्ही.आर.राठी यांनी अभिनंदन केले.

 

 

कंपन्यांबरोबरचे शैक्षणिक करार आणि माजी विद्यार्थ्यांचे सहकार्याने प्रवरेतील विद्यार्थ्यांचा परिपुर्ण विकास होत आहे. परिणामी प्रवरेतील विद्यार्थ्यी उद्योजक होताना दिसत असून अनेकांना उत्तम नोकरी देखील प्राप्त होत आहे. – डाॅ.सुष्मिता विखे पाटील, सीईओ, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!