
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोणी येथील डी.फार्म द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमातील नऊ विद्यार्थ्यांची मार्क्सन फार्मा प्रायव्हेट लिमिटेड गोवा या औषध निर्मिती कंपनीमध्ये निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्र जाधव यांनी दिली आहे.
मार्कसन फार्मा प्रायव्हेट लिमिटेड गोवा या कंपनीने विविध पदांसाठी मुलाखती घेऊन त्या मुलाखतीमध्ये भागवत धुळसौंदर, आशिष केदार, आदिल बागवान, कुणाल अंञे, हर्षल कदम, यश खंडागळे, सिद्धांत ब्राम्हणे, महावीर भिसे आणि आकाश गवळी यांची निवड झाली आहे.
प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतानाच विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना नोकरी आणि व्यवसायासाठी स्वयंपूर्ण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम हे सुरू असतात संस्थेच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांचे वेळोवेळी होणारे परिसंवादा तून नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळते प्रक्षेत्र भेटी, संवाद कौशल्य, मुलाखत तंत्र त्याचबरोबर विविध कंपन्यांशी केलेले करार यामुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मध्ये मोठी संधी मिळत मिळते असे डॉ. जाधव यांनी सांगतानाच ग्रामीण विद्यार्थी हा सर्व गुणसंपन्न असतो त्याला अधिक सक्षम तयार करण्याचे काम महाविद्यालयाच्या माध्यमातून केले जाते.
या विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील,संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ,फार्मसीचे संचालक डॉ.बी. एम. पाटील,ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे डाॅ.मनोज परजणे, महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. अर्चना राजदेव यांनी अभिनंदन केले आहे.
प्रवरेच्या माध्यमातून सक्षम विद्यार्थी घडावा यासाठी विविध सेवा सुविधा या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. येथे शिक्षण घेत असताना आम्हाला सुरक्षा आणि आत्मविश्वास हा खऱ्या अर्थाने या महाविद्यालयाच्या माध्यमातून मिळाला. आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी असताना देखील संस्थेच्या माध्यमातून आम्हाला सक्षम करण्याचे काम महाविद्यालयाच्या माध्यमातून झाले. यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी वेळोवेळी आमच्याशी संवाद साधत आमच्या आणि अडचणीही समजून घेतल्या आणि यातूनच आम्हाला हे यश मिळालं असे निवड झालेल्या आकाश गवळी यांनी सांगितले.
