
(अहिल्यानगर खबतबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी राहुल राजळे /सोनई
नेवासा :- तालुक्यातील सोनई येथील किड्स किंगडम अकॅडमीने निरा येथे पार पडलेल्या स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. इंडियाज टॅलेंट हंट कॉम्पिटिशन २०२४ इंडिया इव्हेंट प्लॅनर द्वारे मान्यता प्राप्त स्पर्धा समता माध्यमिक आश्रम शाळा पडेगाव निरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी पार पडल्या त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रभरातून २३० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
त्यामध्ये किड्स किंगडम अकॅडमी च्या प्रथम क्रमांकावर शिवण्या शरद तांबे , तर द्वितीय क्रमांकावर सानिका महादेव जाधव, अवनी नवनाथ तांबे, यशदिप प्रशांत कडू ,वरद जयदत्त तांबे , तृतीय क्रमांक विराज विनय बेदमुथा, दर्शन संभाजी घनवट, यश गणेश बाडगू ,अर्णव अतुल पाडळकर ,हर्षवर्धन भगवान लांडे,सर्वेश प्रविण बंग यांनी नेत्रदीपक यश संपादन केले यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कीर्ती सचिन बंग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महादेव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
