प्रवरा शिक्षण संस्था

प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थिनींच्या गोड स्वागताने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली उत्साहात 

( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणी नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय वातावरणात झाला. पहिल्या दिवशीच शाळेचे संपूर्ण परिसर फुलांनी, तोरणांनी व आकर्षक सजावटीने सजले होते, जणू काही शाळा आपल्या लाडक्या विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती.

 

प्राचार्या रेखा रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अंगावर फुलांची उधळण करत त्यांचे भरभरून स्वागत करण्यात आले. हा क्षण प्रत्येक विद्यार्थिनीसाठी आनंदाचा आणि स्नेहभावनेने भरलेला ठरला.

 

प्राचार्या मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थिनींना आरोग्यदायी गूळ-शेंगदाण्याचे लाडू खाऊ म्हणून व पेन्सिल भेटवस्तू म्हणून देण्यात आली. या छोट्याशा भेटीतून प्रेम, काळजी आणि नवा उत्साह यांचा संदेश मिळाला.यावेळी सरस्वती पूजनही भक्तिभावाने पार पडले. प्राचार्या मॅडम यांनी सरस्वती मातेचे पूजन करून सर्व विद्यार्थिनींना यशस्वी आणि ज्ञानमय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्साही चमक दिसून येत होती. नवीन वर्ग, नवीन पुस्तके, नवीन स्वप्ने आणि नवीन उर्जा याने संपूर्ण परिसर भरून गेला होता.या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन ‘सुनीता विल्यम्स हाऊस’च्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. 

 

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!