
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी- गोपाल शिंदे
श्रीरामपूर – अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो काढून व्हायरल करायची धमकी देऊन लव-जिहाद मध्ये अडकवण्याचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यात घडला असून या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आरोपी आमिर शेख विरोधात भान्यासं कलम ७४,१३७(२),३५२,बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षक अधिनियम कलम ८ व अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ०३९६/२०२५ नुसार गुन्ह्याची नोंद करून आरोपी आमिर शेख यास ताब्यात घेतले आहे.
घडलेली घटना अशी की,शुक्रवारी दुपारी शहराजवळील एका हॉटेलात एक युवक एका अल्पवयीन मुलीला घेऊन बसल्याचे राष्ट्रीय श्रीराम संघाचे धर्मरक्षक अजिंक्य काथे व शिवांजय उंडे या दोघांनी बघितले.ती अल्पवयीन मुलीबाबत ओळख असल्याने त्यांनी एका हॉस्पिटल येथे कामावर असलेल्या तिच्या आईकडे जाऊन त्याबाबत त्यांना सांगितले.त्यावरून मुलीच्या आईने ताबडतोब त्या हॉटेलात जाऊन बघितले असता तिची अल्पवयीन मुलगी आमिर अजीज शेख रा.भोकर तालुका श्रीरामपूर याबरोबर हॉटेलात बसल्याची त्यांनी बघितले.
या अगोदर देखील माझ्या मुलीबरोबर राहून तिचे अश्लील फोटो काढून तिची बदनामी हाच आमिर शेख करत होता म्हणून मी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात दि.४जानेवारी २०२५ रोजी तक्रार दिली व त्यानुसार त्यास पोलिसांनी ताब्यात देखील घेतले होते परंतु नातेवाईकांच्या सांगण्यावरून त्याच्या जामीन अर्जावर मी हरकत न घेतल्याने आरोपी आमिर तेंव्हा बाहेर आला असल्याचे अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हंटलेले आहे.
हॉटेलात दिनांक ११ एप्रिल २०२५ गेल्यावर माझी मुलगी आमिर शेख याच्याबरोबर बसल्याचे मला दिसली तिला विश्वासात घेऊन विचारले असता माझ्या मुलीने मला सांगितले की माझ्याकडे तुझे जुने फोटो आहेत ते व्हायरल करण्याची धमकी आमिरने देऊन मला या हॉटेलमध्ये घेऊन आल्याचे व माझी अल्पवयीन मुलगी अनुसूचित जातीची असल्याचे माहित असूनही आरोपी आमिर यांने माझ्या मुलीला फसवल्याचे मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.हिंदू धर्मरक्षक जागरूक युवकांमुळे हा प्रकार उघडकीस आला असून कित्येकदा जागरूकता होऊनही लावजिहाद सारखे प्रकार थांबत नसल्याने पालक वर्गात सध्याला चिंतेचे वातावरण पसरले आहे.
हिंदू अल्पवयीन मुलगी लव जिहाद मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याची खबर मिळताच राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी शहर पोलिस ठाण्याकडे धाव घेत पोलिसांना आवश्यक सूचना देत मुलीला व मुलीच्या आईस धीर दिला.याप्रसंगी आरोपीच्या नातलगांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती आमच्या मुलाला सोडून द्या त्याने चूक केलेली नाही असे आरोपीचे नातलगांनी सागर बेग यांना सांगताच बेग यांनी त्यांना तुमच्याच भोकर गावातील एक वर्षापूर्वी हिंदू मुलगा दीपक बर्डे याने मुस्लिम मुलीशी प्रेम करून विवाह केला म्हणून त्याचा पुण्यात खोटे सांगून बोलावून तिथे त्याचा जिहादी मानसिकतेच्या लोकांनी खून केला.त्याचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही असे असताना अल्पवयीन हिंदू मुलींना लव जिहाद मध्ये अडकवून त्यांचे धर्मांतर करणे योग्य आहे का..?असा प्रश्न बेग यांनी करून हिंदू मुली या रस्त्यावर पडलेल्या नाहीत त्यांच्या रक्षणार्थ हिंदू युवक सक्षम असल्याचे सांगताच नातलगांनी तेथून काढता पाय घेतला.
