
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील तरुण तडफदार सरपंच कृष्णा शिंदे यांना दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीने पोस्टामार्फत पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली.
गावात अनेक वेळा तू आम्हाला नडला असून आमच्या अनेक कामात तू अडथळे आणले असून. आम्हाला कायमच नडत असून तुला ८ दिवसाच्या आत संपवू तसेच पोलीस स्टेशनला तक्रार केली तर,तुझा कार्यक्रम केला जाईल.असे धमकीचे पत्र गावात प्रथमच आल्याने गावात मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात सरपंच कृष्णा शिंदे यांनी, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची भेट घेऊन अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले की तातडीने या धमकीच्या पात्राची चौकशी करून यावर करून कारवाई करून तुमच्या जीवास कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेऊ असे सांगितले.
गावात गेल्या दीड ते दोन वर्षापासून शिंदे यांचे काम चांगले असून, अनेकांना याचा त्रास होत आहे. चांगले काम करत असताना गावाच्या काही हिताची निर्णय घेत असताना अनेकांच्या डोळ्यात खपत आहे वाईट कामाला थारा देत नसल्याने कोणीतरी आज्ञात व्यक्तीने हे धमकीचे पत्र पाठवले आहे. आणि विशेष म्हणजे हे पत्र गावातीलच पोस्ट कार्यालयात टाकले त्यामुळे आज्ञाच व्यक्ती हा गावातीलच असण्याची शक्यता आहे त्यामुळे सरपंच शिंदे यांनी सांगितले की, तातडीने या पत्राची दखल घेऊन, माझ्या जीवितास काही धोका होणार नाही याची काळजी घ्यावी गावात जर काही चांगले काम करत असेल.तर काही नाही याचा त्रास पण होतो. त्यामुळेच ही धमकी दिल्या असावी अशी शंका गावात निर्माण झाले आहे. त्यामुळे तातडीने या पत्राची दखल घेऊन पोलिसांनी त्यांचे सहकार्य करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मी गावात सरपंच झाल्यापासून गावाच्या हिताची अनेक चांगली तसेच बोगस कामांना थारा दिला नाही अनाधिकृत कोणतेच काम गावात चालू दिले नाही. मी कायमच गावाच्या हिताच्या कामासाठी लढलो आहे . त्यामुळे अनेकांना चांगले वाटले, परंतु काहिंच्या डोळ्यात मी त्यांचे अनाधिकृत काम केले नाही व त्या कामाला सहकार्य केले नाही त्यामुळेच मला जिवे मारणे धमकीचे पत्र मिळाले.माझा पोलीस प्रशासनावर विश्वास असून ते आरोपीला शोधून काढतील..
-कृष्णा अशोकराव शिंदे,सरपंच बेलपिंपळगाव (ता.नेवासा)
