गुन्हेगारीनेवासा तालुका

थकीत वीज बिलाची वसूल करायला गेलेल्या वीज वितरण कर्मचाऱ्यास मारहाण ; नेवासा खुर्द मधील एका विरुद्ध गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी अंबादास पोपट लोखंडे (रा.नेवासा खुर्द) यांच्या विरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 

नेवासा – वीज वितरण थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला शिवीगाळ,लाथाबुक्यांनी व बँटने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी अंबादास पोपट लोखंडे (रा.नेवासा खुर्द) यांच्या विरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी लहू राम गरगडे (वायरमन) रा.चेडेचांदगाव ता शेवगाव (हल्ली मु.मुकींदपुर ता नेवासा) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की नेवासा शहरालगत असलेले पावण गणपती,अहिल्यानगर परीसरात थकबाकी वसुलीसाठी वायरमन गरगडे हे आहे.

जाहिरात

(दि.१ ) फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान गरगडे व एन.सी. सी एजन्सीचे कामगार राजेंद्र पठाडे हे थकीत लाईट बील वसुली करीता पावण गणपती मंदीरा जवळील पावण अॅक्वा या दुकानात विज बील वसुली करीता गेले.असता दुकानाचे मालक अंबादास पोपट लोखंडे यांनी थकीत विज बीलापोटी १८ हजार तीनशे रुपयांचा धनादेश खात्यात रक्कम नसल्याने रद्द झाला असून थकीत बील भरा असे लोखंडे यांना वायरमन गरगडे हे समजावुन सांगत असताना लोखंडे हे शिवीगाळ करु लागले यावेळी लोखंडे यांना समजावून सांगत असताना लोखंडे यांनी वायरमन गरगडे यांना खाली पाडुन लाथाबुक्यांनी तसेच हातातील लाकडी बॅट गरगडे यांच्या डोक्यात व पायावर मारली. व तुला कुठे जायचे तिथं जाय मी कुणाला घाबरत नाही असे म्हणत माझ्या दारात आला तर तुला जिवे ठार मारील अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जाहिरात

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!