
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयातील अनुक्रमे एम. फ़ार्म अभ्यासक्रमातील दोन तर डी. फार्मसी अभ्यासक्रमातील १२अशा एकूण १४ विद्यार्थ्याची मॅकलिओड्स फार्मासु्टिकल्स या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये कॅम्पस मुलाखती द्वारे निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली.
एम.फार्मसी मधून आकाश भागवत व मोहसीब तांबोळी, आणि तसेच डी फार्मसी मधून निखिल जाधव, भूषण धावणे, सौरभ गाडेकर, अभिजित पिंपळे, सुजित गाढवे, चैतन्य गुंजाळ, प्रणित साळवे, पंकज वऱ्हाडे, बालाजी सिरसाट, ओंकार राजगी, सिद्धार्थ तागड आणि ओम शिंदे यांची मॅकलिओड्स फार्मासु्टिकल्स या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये झाली.
औषधनिर्माणशास्त्रमध्ये अतिशय महत्वाचा समजला जाणारा विभाग म्हणजे संशोधन आणि विकास या विभागामध्ये महाविद्यालयाच्या एकूण १४ विद्यार्थ्यांची निवड होणे म्हणजे महाविद्यलयाच्या दृष्टीने विशेष बाब आहे. विद्यार्थ्याना त्यांच्या अंतिम परीक्षेपूर्वी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. प्रवरा हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायमच अग्रभागी असते.महाविद्यालयात नेहमी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षण, स्वतंत्र ट्रैनिंग आणि प्लेसमेंट विभाग कार्यरत असून त्याचा विद्यार्थ्यांना नेहमी फायदा होत असतो.त्यासाठी महाविद्यालयातील ट्रैनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा, अमोल दिघे,डॉ. सोमेश्वर मनकर,डॉ. सागर मगर, प्रा. मंजुषा म्हस्के यांनी ही मुलाखत यशस्वी होण्यासाठी विषेश प्रयत्न केले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. सौ.शालिनीताई विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.सुश्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख डाॅ. मनोज परजणे, महाविद्यालयाचे संचालक डॉ.बी. एम. पाटील,प्राचार्य डॉ संजय भवर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
