सामाजिक

श्रीरामपूर येथे सक्षम फाउंडेशन आयोजित महिला सन्मान समारंभ संपन्न

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपूर – जागतिक महिला दिनानिमित्त सक्षम फाउंडेशनतर्फे आयोजित महिला सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह व वृक्षभेट देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सुशील पठारे यांनी सक्षम फाउंडेशनच्या उद्दिष्टांची माहिती देऊन केली. त्यानंतर सोनम धीवर यांनी ‘सीओआरओ इंडिया’ च्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. महिलांचे कायदेशीर अधिकार व संरक्षण योजनांवर संरक्षण अधिकारी शुभदा शेळके यांनी मार्गदर्शन केले, तर महिलांसाठी कायदे व हक्क याविषयी अॅड. ज्योत्सना कदम यांनी माहिती दिली. महिला उद्योजकता या विषयावर सिस्टर जॅकलिन यांनी विचार मांडले, तसेच महिला आर्थिक साक्षरतेवर प्रमुख अतिथी दिशा पिंकी शेख यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात आशा सेविका, अंगणवाडी सेविका व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान समारंभात श्रीरामपूर शहरातील १२० महिलांनी सहभाग घेतला. तसेच यावेळी गोंधवणीचे सरपंच प्रविण फरगडे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष शेळके, योगेश जाधव, विलास ठोंबरे, गोंड समाज अध्यक्ष सोनू जमकर आणि ग्रासरूट नेतृत्व व संस्था विकास कार्यक्रमाच्या रेखा वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी “हिंसामुक्त घर – महिलांचे हक्क” या पुस्तिकेचे प्रकाशन करून महिलांना वाटप करण्यात आले. तसेच, महिला सक्षमीकरणासाठी विविध शासकीय योजना आणि कायदेविषयक हक्क व अधिकार यावर सहकार्य करण्याचा निर्धार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी महिला सन्मान शपथ घेण्यात आली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!