आरोग्य

जळगाव आरोग्य उपकेंद्रात एक्सरे शिबिराचे आयोजन;एक्सरे व श्रयरोग तपासणी शिबिरात १७७ नागरिकांचा सहभाग

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) 

 

राहाता – प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी यांच्या सहकार्याने आरोग्य उपकेंद्र जळगाव यांच्या सयुक्तविद्यमाने १०० दिवस टीबी मुक्त भारत या अभिनव उपक्रमाच्या अनुषंगाने सोमवारी (दि.२४) रोजी जळगाव आरोग्य उपकेंद्रात छातीचा एक्सरे काढण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव आरोग्य उपकेंद्रात एक्सरे कॅम्पसह टीबी मुक्त अभियान राबविण्यात आले.यावेळी टीबी मुक्त आभियाना अंतर्गत ६० वर्ष वयाचे नागरिक ज्यांना ब्लड प्रेशर सह शुगरचा क्षयरोगाचा त्रास आहे असे व्यक्ती घरातील कायम स्वरुपी आजारी राहणारे व्यक्ती ज्यांना श्रयरोग आजाराची लक्षणे आहेत. अश्या रुग्णांची तपासणी करण्यात येवून अभियानात तब्बल १७७ नागरिकांचे छातीचे एक्सरे काढण्यात आले.

 

यावेळी डॉ. सचिन घेरडे वैद्यकिय अधिकारी डॉ.स्वाती घोगरे राहाता तालुका क्षयरोग तज्ञ श्रीमती घोडेराव,डॉ.राजू शिंदे,आरोग्य सहायक बनसोडे आरोग्य सहायक तनपुरे,रविंद्र काळे,आरोग्य सेवक,श्रीमती शितल दिवे,आरोग्य सेविका, जाधवर आरोग्य सेवक सांगळे आरोग्य सेवक, सिद्धार्थ पाळंदे आदींनी टी.बी आजारावर उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना माहिती देवून तज्ञपर मार्गदर्शन केले.

 

यावेळी आशा सेविका सविता कापरे,मिरा कापरे, मनिषा शिनगारे, रुपाली गाढवे, स्वाती बोरावके तसेच चितळी चांगदेवनगर रामपुरवाडी येथील आशा स्वयंसेविका यांनी रुग्णांची तपासणी करण्यात मोलाचे सहकार्य केले.यावेळी जळगावचे सरपंच शिवाजी साबदे उपसरपंच,दिलीप चौधरी,यांच्यासह जळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!