आरोग्यमहाराष्ट्र

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटलतर्फे आरोग्य उपकेंद्र वडगाव गुप्ता येथे गरोदर माता तपासणी शिबिर संपन्न

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर –डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून गरोदर माता आणि नवजात शिशूंच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेले उपक्रम आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागाच्या माध्यमातून वडगाव गुप्ता येथील आरोग्य उपकेंद्रावर गरोदर माता तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.

या शिबिरात गरोदर मातांना आहार, व्यायाम, आवश्यक वैद्यकीय तपासण्या तसेच प्रसूतीसंबंधी तज्ज्ञ सल्ला देण्यात आला. हॉस्पिटल प्रशासनाकडून मातांच्या आरोग्याबाबत विशेष लक्ष दिले जात असून, वेदनारहित व सुरक्षित प्रसूतीसाठी या ANC क्लिनिकचा मोठा फायदा होत असल्याचे चित्र समोर आले आहे.स्त्रीरोग विभागाच्या डॉ. अदिती राठी, डॉ. जिवा भिसे, डॉ. शुभांगी इंगळे व डॉ. वसुंधरा यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. समाजसेवा विभागाच्या काउन्सेलर सौ. उज्वला थोरात यांनी मातांना मानसिक आधार व मार्गदर्शन केले.

शिबिरास वैद्यकीय उपअधीक्षक डॉ.सतीश मोरे व समाजसेवा विभाग प्रमुख मा.संतोष साळवे यांनी भेट देऊन गरोदर मातांशी संवाद साधला. योग्य आहार, सुरक्षित मातृत्व आणि मोफत वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटल व स्टाफ सदैव तत्पर असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या शिबिरामुळे अनेक मातांना योग्य मार्गदर्शन मिळाले असून, “सशक्त माता – निरोगी पिढी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!