
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – येथे नव्याने सुरू होणाऱ्या ‘ओम साई मेडिकल’ या प्रशस्त आणि सर्व सुविधायुक्त असलेल्या मेडिकल शॉपचे उद्या (दि. २ ऑक्टोबर) दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भव्य उदघाटन सोहळा पार पडणार आहे.चितळी-जळगाव पंचक्रोशीतील अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून परिसरातील नागरिकांसाठी हे आधुनिक सुविधा असलेले मेडिकल उपयुक्त ठरणार आहे.

संचालक सुनील गायकवाड व निलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल शॉपमध्ये सर्व प्रकारच्या औषधांसह आरोग्यसंबंधी वस्तू सहज उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. रुग्णांना आवश्यक ते औषध वेळेवर मिळावे, यासाठी योग्य साठा ठेवण्यात आला आहे. तसेच ग्राहकसेवा व विशेष सुविधा यांचीही व्यवस्था करण्यात आली असून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी जगन्नाथ गायकवाड, अशोक गायकवाड, संजय गायकवाड, सूरज गायकवाड, रूपेश गायकवाड, राकेश लोंढे व गायकवाड परिवार यांच्या कडून नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.दसऱ्यासारख्या सणाच्या मुहूर्तावर सुरू होत असलेले हे मेडिकल शॉप चितळी परिसरातील आरोग्यसेवेला नवी दिशा देईल, असा विश्वास ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.




