धार्मिकसामाजिक

चितळी स्टेशन परिसरात शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

चितळी परिसरात दुमदुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – शिवजन्म उत्सव समिती चितळी स्टेशन यांच्या संयुक्तविद्यमाने (दि.१९)अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येवून शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी समस्त शिवभक्तांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश्वर प्रतिकृतीतील मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन व आरती करण्यात आली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अश्या जयघोषाने चितळी स्टेशन परिसर शिवभक्तिमय होवून दुमदुमून गेला.

याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची व मावळ्यांची वेशभूषा साकारली होती.यावेळी शिवरायांच्या जीवनकार्याबद्दल विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केले.यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भगवे ध्वज हाती घेतले होते छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर गायलेल्या पोवाड्यावर लेझीम नृत्य सादर करीत उपस्थित मान्यवरांचे मने जिंकले.

 

 

यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीसे वितरण करण्यात आले त्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. 

यावेळी चितळीचे प्रथम लोकनियुक्त नारायणराव कदम, छावा बिग्रेडचे संस्थापक विश्वनाथ वाघ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाउपाध्यक्ष योगेश बनसोडे,विक्रम वाघ, दीपक वाघ, सामाजिक कार्यकर्ते अतुल चौधरी,उद्योजक शिवाजीराजे कदम,अविनाश भंडारे, रवींद्र चौधरी, प्रदीप चौधरी,शिवजन्म उत्सव समितीचे सदस्य संतोष चौधरी,विशाल रंगाळे, महेंद्र भोसले,जी.प.शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण हराळे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सुसरे,सेतू केंद्र चालक अनिल नळे,राजेंद्र ठाणगे, राजेंद्र शेळके,चांगदेव जाधव,भाऊसाहेब साळुंके,प्रशांत लांडे, देवेंद्र चौधरी, संकेत सुसरे, गणेश गाठे, संजय मगर, मनोज गायकवाड, दर्शन गायकवाड, सार्थक शिंदे, दत्तात्रय गायकवाड यांच्यासह चितळी स्टेशन व गाव परिसरातील समस्त ग्रामस्थ व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!