सामाजिक

जळगाव ग्रामस्थांच्या पुढाकाराने साकारले ‘शिवराज्यभिषेकाचे’ तैलचित्र

शिवजयंतीदिनी मोठ्या उत्साही वातावरणात १०५ चौरस फूट आकाराच्या तैलचित्राचे अनावरण!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता –छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी तालुक्यातील जळगाव येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने सुप्रसिद्ध चित्रकार भरतकुमार उदावंत व चित्रकार रवी भागवत यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या शिवराज्याभिषेकाच्या तैलचित्राचे आज अनावरण व लोकार्पण करण्यात आले.

 

१८ बाय ५.५ फूट आकाराच्या भिंतीवर सुमारे १०५ चौरस फूट आकाराचे हे भव्य असे शिवराज्याभिषेकाचे चित्र साकारण्यात आले असून जळगाव येथील तरूणांनी एकत्र येत स्वखर्चाने चित्राची उभारणी केली. चार दिवसांमध्ये सुमारे ३८ ते ४० तास सलग चित्र रेखाटण्याचे काम सुरू होते. चित्राभोवती शिवकालीन किल्ल्यांप्रमाणे बुरूजांची निर्मिती करण्यात आली आहे. शिवाय चित्रासमोर सुंदर नक्षी असलेले ग्रील बसविल्याने चित्रास एका स्मारकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी या स्मारकास सुंदर अशी केसरी भगव्या रंगाच्या फुग्यांची सजावट करण्यात आली होती. गावातील तरूण वर्गाचे मोठे सहकार्य या उपक्रमास लाभले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनाचे औचित्य साधून या चित्राचे लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी उदावंत व भागवत यांच्यासह गावातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते चित्राचे अनावरण व शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी, गणेश कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी, अण्णासाहेब चौधरी, गंगाराम साबदे, सुरेश चौधरी, आप्पासाहेब चौधरी, दत्तात्रय चौधरी, एकनाथ निर्मळ, भास्कर चौधरी, एकनाथ चौधरी, रंगनाथ चौधरी, बाजीराव चौधरी, भिमराज वाणी, बाळासाहेब वाघ, खंडू वाघ, विजय चौधरी, भागवत वाघ, दत्तात्रय वाणी, शाम चौधरी, बाबासाहेब चौधरी, तुषार चौधरी, बाळासाहेब चौधरी,अण्णासाहेब चौधरी, रवींद्र चौधरी, कार्तिक चौधरी, विकी वाघ, गणेश चौधरी, किशोर चौधरी, नवनाथ चौधरी, गोरख चौधरी, महेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!