
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी – राहुल राजळे
सोनई – येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यास महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, महाराष्ट्र शासन व जिल्हा रोजगार विकास केंद्र, अहिल्यानगर याची मान्यता प्राप्त झाली आहे. या केंद्रांतर्गत कौशल्य आधारित वेब डेव्ह्ल्पर व अकौंट असिस्टंट हे कोर्सेस सुरु करण्यात येणार आहेत.
वेब डेव्ह्ल्पर या कोर्ससाठी एकूण 90 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात व अकौंट असिस्टंट या कोर्स साठी 60 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात व या कोर्सेसचा कालावधी 6 महिने असून बारावी उत्तीर्ण किंवा पदवी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी प्रवेशसाठी पात्र आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष उदयन दादा गडाख यांच्या प्रयत्नातून या कोर्सेसला परवानगी मिळाली असून कौशल्य आधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी वाढणार आहेत.
संस्थेचे सचिव मा. उत्तमराव लोंढे , सहसचिव मा. विनायकराव देशमुख यांनी महाविद्यालायाचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ.शंकर लावरे , उपप्राचार्य डॉ.ज्ञानदेव झिने यांनी ही माहिती दिली असून प्रा. महेश जंगले हे समन्वयक म्हणून काम करत आहेत.
