प्रवरा शिक्षण संस्थालोणी

प्रवरेतून मुलींना आत्मविश्वास मिळतो- माजी विद्यार्थीनी वैशाली कोतकर-माने

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

लोणी –प्रवरेने दिलेल्या संस्कारामुळे मला मोठे होता आले. या ठिकाणी बघितलेले चढ उतार आणि शिक्षण यातून पुढे जातांना मीही शिक्षण क्षेत्रात यशस्वी होऊ शकते हा आत्मविश्वास मिळाला.प्रवरेच्या आदर्श घेऊनच मी शैक्षणिक संकुल सुरु करुन शकले असे प्रतिपादन भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका आणि माजी विद्यार्थीनी सौ. )वैशाली कोतकर-माने यांनी केले.

 

लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवराग ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४९ व्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात वैशाली कोतकर-माने बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालीनीताई विखे पाटील, माजी विद्यार्थीनी सौ.अणिता घोगरे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य अनिल विखे, प्राचार्या सौ.रेखा रत्नपारखी, प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या प्राचार्या सौ. भारती कुमकर,प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. बी.बी. अंबाडे आदींसह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांनी पालकांशी संवाद साधताना वैशाली कोतकर-माने म्हणाल्या की, प्रवरेच्या माध्यमातून मिळालेल्या संस्कारामुळे मला खूप काही शिकायला मिळाले येथील शिस्त, मिळणारे प्रोत्साहन, प्रेरणा त्याचबरोबर नेतृत्व गुण यामुळे मीही संस्था उभे करू शकले हा आत्मविश्वास मला प्रवरेतून मिळाला. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच विविध कला अवगत करा कष्ट करा आपले ध्येय साध्य करा आव्हानांना सामोरे जा यातूनच आपण सक्षम विद्यार्थी होणार असून जीवनातील चढ-उतार यातून खूप काही शिका आणि यातूनच पुढे जावे असे आवाहन करत माजी विद्यार्थी हे संस्थेला काहीतरी देणं लागते या माध्यमातून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेले शंभर पुस्तके शाळेत भेट देत या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडावेत आणि वाचन संस्कृती जतन व्हावी हा आपला उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

 

संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी प्रवरेचा माध्यमातून सक्षम विद्यार्थी घडवत असताना संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरेतील विद्यार्थी हा नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा ठरावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

 

महिलांसाठी प्रवरेचा कॅम्पस हा सुरक्षित असल्यामुळे राज्यभरातून विद्यार्थ्यांची मोठी संख्या या भागात आहे. शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने येथील विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्या कला संस्कृती आणि विविध विषयाचे ज्ञान देऊन एक सक्षम विद्यार्थी प्रवराच्या माध्यमातून घडावा यासाठी विविध उपक्रम हे सुरू आहेत. पालकांचाही यामध्ये सहभाग वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करतानाच विविध उपक्रमातून सक्षम विद्यार्थी हाच आपला ध्यास असल्याचे त्यांनी सांगून येणाऱ्या काळामध्ये प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा आणि सीईटी, नीट आणि जेईई ची तयारी करण्यासाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रारंभी प्राचार्या सौ.रेखा रत्नपारखी यांनी वार्षिक अहवाल वाचन करत असताना शाळेच्या शैक्षणिक आणि विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्राचा आढावा घेतला.कार्यक्रमाचे आभार अनिता घोगरे यांनी मानले. 

 

 “सांस्कृतिक कार्यक्रम हा पालकांसह सर्वांसाठीच मेजवानी ठरला या माध्यमातून उत्तर भारतातील विविध कला, संस्कृती,परंपरा,आहार,पोषाख आणि सणवार उत्सवाची माहिती देणारा ठरला. कार्यक्रमाच्या निमित्ताने गुणवंत आणि विविध क्षेत्रात नेत्र दीपक कामगिरी केलेल्या विद्यार्थ्याचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!