
(अहिल्यानगर खबरबात डिजिटल)
प्रतिनिधी – वैभव ताजणे
आश्वी- रविवारी (दि.५) जानेवारी रोजी मध्य रात्री २.३० वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी येथील देवीचा मळ्यात शेतकरी महादेव भिवराज गिते यांच्या मालकी (गट.नं १२) मधील घरा समोरील टॉयलेट मध्ये भक्षाचे पाठलाग करताना अंदाज न आल्याने बिबट्या मादी वय वर्ष अंदाजे १ वर्ष ही टॉयलेट मध्ये अलगत अडकली होती वनविभागाच्या प्रयत्नाने मादी बिबट्याला जंगलात निर्सगाच्या सानिध्यात सोडण्यात आल्याचे संतोष पारधी यांनी सांगितले.
मध्य रात्री घराबाहेर कसला तरी आवाज येत असल्याने महादेव गिते यांनी बाहेर डोकवु बघितले असता बिबट्याचा टॉयलेट मधुन आज येत होता परंतु बाहेर येण्याचा अंदाज नं आल्याने ती बाहेर येण्याचा प्रयत्नात बंद झालेल्या दरवाजाला धडका घेत राहिली. त्यांनी प्रसंगावधान राखत दरवाजाला बाहेरून कडी लावली. तात्काळ या बाबत वन अधिकारी श्री. हरिचंद्र जोजर यांना सविस्तर माहिती दिली. त्या बाबत श्री जोजर यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी संगमनेर भाग ३ चे सुभाष सांगळे यांना याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य बघता सुभाष सांगळे यांनी तात्काळ बिबट रेस्क्यू टीम सज्ज करून वनपरिमंडळ अधिकारी पानोडी सुहास उपसनी यांचे नेतृत्वात रेस्क्यू टीम संतोष पारधी,गजानन पवार, वाहन चालक रामभाऊ वर्पे यांच्या टीम ने टॉयलेट मध्ये अडकलेला बिबट्या मदीला शीताफीने पिंजऱ्यात घेतले. बिबट्या पिंजऱ्यात असल्याचे समजताच ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. वन अधिकारी यांचे सर्वांनी आभार व्यक्त करून कौतुक केले.
अनेकदा रात्रीची लाईट असल्यामुळे शेतीला पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणी भरण्यास जावे लागते. अनेकदा शेतकऱ्यांना बिबट्याचा सामना करवा लागतो. प्रिंपी लौकी गावाच्या वतीने सरकार ला विनंती आहे की दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा तसेच वनविभागाने तत्काळ गावचा सर्वे करून बिबट्या पकडण्यासाठी पिजऱ्यांची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सेवानिवृत्त प्राध्यापक कान्हु गिते यांनी यावेळी केली.
