महाराष्ट्रसामाजिकसाहित्य

साताऱ्यात १० ते १२ जानेवारी दरम्यान २० वे जागतिक मराठी संमेलन संपन्न होणार! जागतिक मराठी एकादमीचे उपाध्यक्ष जेष्ठ साहित्यीक यशवंतराव गडाख पाटील यांनी दिली माहिती

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

प्रतिनिधी-राहुल राजळे

सोनई- जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने (२०.वे) जागतिक संमेलन शोध मराठी मनाचा येत्या (दि.१० ते १२) जानेवारी दरम्यान सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात संपन्न होणार असल्याची माहिती जागतिक मराठी एकादमीचे उपाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा खा यशवंतराव गडाख पाटील यांनी दिली आहे. 

 

याविषयी माहिती देताना गडाख यांनी (२० व्या) जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन शुक्र (दि.१०) जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पद्माविभुषण खासदार शरद पवार यांच्या शुभहस्ते तसेच ज्येष्ठ विचारवंत आ.ह.साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली व ना.शिवेंद्रराजे भोसले, ना. आशिष शेलार, कवी तसेच प्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे सांगितले.

 

जागतिक मराठी परिषदेच्या माध्यमातून यापूर्वी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर,अहिल्यानगर नाशिकसह गोवा, आदी विविध ठिकाणी संमेलने संपन्न झाल्याची माहिती गडाख यांनी देऊन यंदाचे (२०.वे) जागतिक मराठी संमेलन साताऱ्यात आयोजित करण्यात आल्याचे नमूद केले आहे. संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी जागतिक मराठी भूषण पुरस्काराने उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना तर ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांना जागतिक मराठी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती गडाख यांनी यावेळी दिली.

 

यावेळी शोध मराठी मनाचा या उपक्रमाद्वारे चित्रपट, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या अमेरिका, कॅनडा, इंग्लंड,ऑस्ट्रेलिया, दुबई, अशा परदेशात भारताचे नाव उज्वल करणाऱ्या भारतीयांचा मुलाखतीतून जीवन प्रवास उलगडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तरुण तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या प्रमुख हेतूने या मान्यवरांच्या प्रकट मुलाखती घेण्यात येणार असल्याने याचा सर्वांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन गडाख यांनी केले आहे. या संमेलनाचा समारोप (दि.१२) जानेवारी रोजी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई तसेच खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती गडाख यांनी दिली आहे.जागतिक मराठी अकादमीचे संमेलन यशस्वी होण्यासाठी जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक रामदास फुटाणे व अकादमीचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत.

 

“सन २००५ ला अहिल्यानगरला जेष्ठ साहित्यीक मा खा यशवंतराव गडाख यांच्या पुढाकारातून संपन्न झाले होते जागतिक मराठी अकादमीचे संमेलन जागतिक मराठी अकादमीचे अहिल्यानगर येथे शोध मराठी मनाचा हे संमेलन जानेवारी २००५ मध्ये जागतिक मराठी अकादमी व मुळा एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले होते यास अहिल्यानगरमधील साहित्यप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला होता.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!