
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
अहिल्यानगर- गुरु काशी विद्यापिठ,भटिंडा पंजाब येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय बॉक्सिंग स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात कु.प्रतिभा मनोज गायकवाड हीने कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे ती सध्या त्रितीय वर्ष मानसशास्त्राचे शिक्षण घेत आहे बॉक्सिंग स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी करत आपल्या गावाच्या व महाविद्यालयाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापिठ अंतर्गत झालेल्या न्यु आर्टस् काॅलेज पारनेर येथिल जिल्हास्तरीय बाॅक्सिंग स्पर्धेत कुमारी प्रतिभा हिने सुवर्ण पदक पटकविले व तिची निवड निवड बी.जे.एस्.काॅलेज वाघोली पुणे येथे झोनल बाॅक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. तेथेही कुमारी प्रतिभा मनोज गायकवाड हिने नेत्रदिपक काम करत सुवर्णपदक पटकविले व तिने नाव पुढील पंजाब भटिंडा येथे पार पडणाऱ्या बाॅक्सिंग स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
गुरुकाशी विद्यापिठ ,भटिंडा पंजाब येथे एकुन १२ मुलींचा संघ घेऊन श्री.विशाल परदेशी सर व सौ. हर्षला सुतार महिला प्रशिक्षक कोच म्हणुन सर्वांना प्रोत्साहन दिले.येथेही प्रतिभा हिने नेत्रदिपक काम करत चार राऊंड काढत आपल्या काॅलजचे व गावाचे नाव ऊज्वल केले आहे.
कु.प्रतिभा हिस सुरुवातीपासुन शाररीक शिक्षण संचालक डाॅ.विजय म्हस्के ,क्रिडा संचालक प्रा.संभाजी ढेरेसर ,तिचे कराटेचे मास्टर सचिन पवार सर , मास्टर आशोक शिंदे सर तसेच तिचे पालक श्री मनोज भाऊसाहेब गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कामगिरी बद्दल कु.प्रतिभाचा चितळी गांवकरी पंचक्रोशी,मोहटा देवी मित्रमंडळ,जळगांव पंचक्रोषीतुन शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
