
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी –कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे मंगळवार दि. ८ आणि ९ एप्रिल २०२५ पासून दोन दिवस कालावधीचे बंधिस्त शेळीपालन या विषयी ग्रामीण युवक युवतींना आणि शेतक-यासांठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती केंद्राचे प्रभारी प्रमुख शास्ञज्ञ शैलेश देशमुख यांनी दिली.
सदर प्रशिक्षणाम्ध्ये शेळ्यांच्या जाती, शेळ्यांचे रोग व आजार व्यवस्थापन, मटणासाठी शेळीपालन, प्रकल्प आराखडा तयार करणे, मार्केटिंग, शेड उभारणी, बँकिंगच्या विविध योजना शासकिय योजना यांसारख्या विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
इच्छुक आणि गरजूंनी प्रवेशासाठी केंद्राशी ८२०८६४२८९९ / ९९२१७५५३६४ या फोन द्वारे अथवा प्रत्यक्ष लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
