राजकीयसंगमनेर

विखे गटातील ग्रामपंचायत सदस्यांना सत्ताधाऱी थोरात गटाकडुन विकासकामात सवतीची वागणूक -भाऊसाहेब खेमनर

विखे गटातील सदस्यांना विश्वासात न घेता विकास कामे करण्याचा सपाटा सुरू

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

आश्वी- वैभव ताजणे

संगमनेर:(ता.२६) – संगमनेर तालुक्यातील आश्वी.बु येथील ग्रामपंचायत मध्ये सत्ताधाऱी थोरात गटा कडुन विखे गटातील ग्रामपंचयात सदस्याना विकासकामा मध्ये सवतीची वागणूक मिळत असुन हेतु पुरस्कृत विखे गटातील ग्रामपंचायत सदस्याच्या वार्ड मध्ये विकास कामाना बगल देत दुजाभव करत असल्याचे विखे गटातील ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खेमनर व अनिल कंगणकर यांनी आरोप केले आहे.

गेल्या १० वर्षापासुन आश्वी.बु तालुका संगमनेर येथील ग्रामपंचायत ही माजी आमदार बाळासाहेब थोरात गटाकडे आहे.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाकडे यावेळी ग्रामपंचायत येईल असे असताना विखे पाटील गटा मध्ये कार्यकत्या मध्ये गटातटाच्या राजकारणामुळे हाता तोंडाशी आलेला विजयाचा घास निघुन जात माजी आमदार बाळासाहेब थोरात गटाकडे वर्चस्व राहीले. त्यातच सत्ते मध्ये असलेले थोरात गटाचे ग्रामपंचायत सदस्य हे आपल्या वार्डमध्ये कामे करताना मग्न असल्याचे दिसत आहे.मासिक मिटिंग मध्ये ग्रामविकास अधिकारी,सरपंच, उपसरपंच तसेच सदस्यांनी गावातील विकास कामाचे उदघाटन सर्वांना बरोबर घेऊन करण्याचे ठरलेले असतांनी ही थोरात गटातील सदस्यांचा एक कल्ली गाव कारभार सुरू असल्याचे दिसत आहे.

 

 

एक वर्षा पुर्वी डॉ.अभिजीत गायकवाड हॉस्पिटल ते गावठाण भुमिगत गटार ह्या कामासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पुर्तता करण्यात आली होती. त्या अनुशंगाने या भुमीगत गटार कामासाठी लागणारे ठराव तसेच पंचायत समिती संगमनेर यांच्या कडे सर्व लेखी आव्हाल तसेच कामासाठी लागणारा खर्चाचा आढावा घेऊन या कामासाठी ३ लाख रूपये मंजुर करण्यात आले आहे.-भाऊसाहेब खेमनर (विखे गट)ग्रामपंचायत सदस्य,आश्वी.बु  

 

आश्वी बु येथील वार्ड क्रमांक ३ मधील डॉ गायकवाड हॉस्पिटल ते गावठाण येथील मंजुर असलेली भुमीगत गटार काम हे हेतु पुरस्कर टाळले जात आहे. दर वर्षे ग्रामपंचायतला विविध कर पोटी १५ हजार रूपये देऊन सुध्दा मुलभुत सुविधा पासुन वंचित राहत असल्याची खंत डॉ.अभिजीत गायकवाड यांनी व्यक्त केली.

 

सध्या डॉ.गायकवाड हॉस्पिटलच्या मागील कालीका माता मंदिर रस्त्याकडील भुमीगत गटारीचे काम सुरू आहे. पहिले त्या कामाला प्राधान्य दिले जाईल डॉ गायकवाड ते गावठाण रस्ता ही भुमीगत गटारी साठी पुन्हा नविन प्रस्ताव सादर करून व महिन्या नंतर ह्या गटारीचे काम सुरू करण्यात येणार आहे.-नामदेव शिंदे (थोरात गट)सरपंच ग्रामपंचायत,आश्वी बु

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!