अहिल्यानगर जिल्हाराजकीयराहाता तालुका

धनगरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विखे-काळे गटाच्या मिनाबाई रकटे यांची बिनविरोध निवड

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या धनगरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विखे-काळे गटाच्या ग्रामपंचायत सदस्य सौ. मिनाबाई राजेंद्र रकटे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात २९ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत अधिकारी सरला कहार यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी लोकनियुक्त सरपंच गोपीनाथ भाऊसाहेब खरात, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव रामभाऊ आदमाने, गणेश शिवाजी राशिनकर, अशोक हरिभाऊ रकटे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सौ. मिनाबाई राजेंद्र रकटे यांचे ग्रामस्थ व मान्यवरांनी अभिनंदन केले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन व फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी रंगनाथ जगन्नाथ राशिनकर, दत्तात्रय नामदेव रकटे, अनिल पुंजाजी रकटे, दादासाहेब हरिभाऊ मंडलिक, संभाजी जानूकु आदमाने, अंबादास गीताराम रकटे, अनिल प. रकटे, योगेश भानुदास रकटे, शिवाजी सखाराम राशिनकर, लक्ष्मण रावसाहेब राहिंज, गौरव अंबादास रकटे, रोहन अशोक रकटे, अशोक सखाराम रकटे, बन्सी शंकर लांडे, प्रमोद बन्सी लांडे, सौरभ संजय रकटे, संदीप लांडे, दत्तु राशिनकर, चांगदेव सातव, साईनाथ भुसारी, ऋषिकेश राशिनकर, बाबासाहेब दातीर, कैलास राशिनकर तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे शिपाई विलास साळुंके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!