प्रवरा शिक्षण संस्था

प्रवरेचे डॉ.राजेंद्र कोबरणे बुधवारी अहिल्यानगर आकाशवाणीवर!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी –लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या दाढ बुद्रुक येथील महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ.राजेंद्र कोबरणे यांचे बुधवार दि.२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८.४० वाजता आणि रात्री ८.१५ वाजता साहित्य सौरभ कार्यक्रमांतर्गत अहिल्यानगर आकाशवाणी केंद्रावरून काव्यवाचन होणार आहे. 

 

विज्ञान शाखेचे उच्च विभूषित असतानाही मराठी भाषेवरती विशेष प्रेम डॉ. कोबरणे यांचे राहिले आहे. प्रवरा शब्दस्नेही व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या साहित्य संमेलन आणि कवि संमेलनामध्ये सहभाग घेतला आहे.रसिक श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!