कोपरगाव तालुकाशैक्षणिक

कोपरगाव तालुका गणित व विज्ञान प्रदर्शनात श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयाचा आयुष बत्तासे तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला!

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

प्रतिनिधी- अक्षय काळे

 

कोपरगाव-कोपरगाव तालुका गणित व विज्ञान 52व्या प्रदर्शनाचे (दि ७ व ८) जानेवारी दरम्यान संवत्सर येथे आयोजन करण्यात आले होते आ आशुतोष काळे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय गौतमनगर सुरेगाव या विद्यालयाने गणित व विज्ञान प्रदर्शनामध्ये आपले उपकरणे प्रदर्शित केले होते.

 

यामध्ये १ ली ते ५वी विज्ञान गटात द्वितीय क्रमांक-आयुष गणेश बत्तासे श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय गौतमनगर सुरेगाव (गुरूकुल)या विद्यार्थ्यांने ग्रास हार्वेस्टिंग मॉडेल हे उपकरण सादर करत या गटात तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला या गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये इ .१ली ते ५वी इ ६वी ते ८वी.व इ ९वी ते १२वी.असे तीन गट निहाय तब्बल २०० उपकरणे ठेवण्यात आले होते.

 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री राजेश आबा परजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, गटविकास अधिकारी संदीप दळवी,विज्ञान अध्यापकाचे अध्यक्ष योगेश सावळा, उपाध्यक्ष श्री रमेश हिंगे तसेच मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री आर आर पाचोरे ,के.व्ही वसावे  जगताप सर यांच्या हस्ते आयुष बत्तासे याचा प्रमाणपत्र व विजयी करंडक देऊन सन्मान करण्यात आला.

 

 

सर्व सहभागी विद्यार्थांचे तसेच आयुष बत्तासे याच्या यशाबद्दल माजी आमदार श्री अशोकराव काळे,रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार श्री आशुतोष काळे.स्थानिक स्कुल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष-सदस्य तसेच सर्व पालकांनी कौतुक करत मार्गदर्शक मुख्याध्यापक आर.आर पाचोरे, जे,आर बैरागी, के.व्ही वसावे, जगताप सर, ए.जी भगुरे जे यु खंबायत,जेष्ठ शिक्षक श्री आर के शिंदे, एस.के थोरात,श्रीमती एस एस राऊत,कुऱ्हाडे मॅडम. यांना शुभेच्छा दिल्या यावेळी व्याख्याते अमोल चिने , विस्तार अधिकारी, शेवंता पुजारी, केंद्रप्रमुख,भारती शेळके, विलास भांड,बाबाजी इराळे, बाबासाहेब महानुभव, रावसाहेब लांडे, तोरवणे साहेब, दहिफळे सर, साबळे सर ,दिघे सर ,मुख्याध्यापक देशमुख सर, पाचोरे सर, मोरे सर व त्यांचा संपूर्ण स्टाफ , गणित व विज्ञान अध्यापक संघाचे समितीचे सदस्य, पवार सर, गोसावी सर, बोडखे सर, गायकवाड सर, हिंगे सर,सलामे सर,सचिन कडू सर,वडवी,डी.एम,गायकवाड सर,दिलीपराव बोरणारे,गोवर्धन परजणे, सामाजिक कार्यकर्ते संजयराव काळे, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्क्ष मधुकर साबळे, सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,गटविकास अधिकारी संदीप दळवी, कृषी अधिकारी सचिन कोष्टी, पंडितराव वाघीरे, गट सर्व विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख, सुरेश वाबळे सर ,मुख्याध्यापक सर्व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सर्व उपस्थितांचे आभार विज्ञान अध्यापक संघाचे प्रमुख योगेश सावळा यांनी मानले.

 

 

 

 

जाहिरात

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!