
(प्रतिनिधी:-राहुल राजळे /सोनई)
नेवासा:-सोनई (ता.नेवासा) येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनई या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अभिषेक बाराहाते याची ‘सोनी’ (हिंदी चॅनल) मधील प्रसिद्ध ‘सुपर डान्सर’ या शोमध्ये पहिल्या एपिसोडमध्येच प्रमुख चेहरा म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
आपल्या अंगातील सुप्त कलागुणांनाच्या जोरावर अभिषेक याने संधीचे सोने केले आहे हिंदी वाहिनीवरील छोट्या पडद्यावर यशस्वीरित्या पहिलं पाऊल टाकत पदार्पण केल्या बद्दल अभिषेक बाराहाते याचा माजी मंत्री शंकरराव गडाख, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला असून त्यास पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे.
कला क्षेत्रातील भावी वाटचालीसाठी माजी मंत्री शंकरराव गडाख,यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख, उपाध्यक्ष उदयन गडाख आदीं मान्यवरांनी आवर्जुन सहकार्य केले असल्याचे मत अभिषेक बारहाते यांनी व्यक्त केले आहे.सोनई नवरात्र महोत्सवामुळे सांस्कृतिक कार्यक्रम सोहळ्यात विविध कला गुण सादर करता आले यामुळे स्वतःमधील असलेल्या नृत्य कलेची जाणीव झाली असल्याचे अभिषेक बारहाते यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी मुळा एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी डॉ.अशोकराव तुवर, उपप्राचार्य डॉ.ज्ञानदेव झिने , डॉ. हरिश्चंद्र सडेकर, डॉ. मोहिउद्दीन शेख, डॉ. राजेश वाघ, डॉ. जगदीश सोनावणे,डॉ. तुकाराम जाधव, संदीप शिरसाठ, रवी ससाणे, अशोक दूंडे आदी उपस्थित होते.