धार्मिकशैक्षणिकसामाजिक

महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उद्योजक अनिलकुमार गुप्ता यांच्या सहकार्याने आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऊबदार कपडे व शैक्षणिक साहित्याचे वाटप !!

नवी दिल्ली येथील आदित्य केअर अँड एज्युकेशन सोसायटी,यांच्या वतीने सामाजिक उपक्रम संपन्न

(प्रतिनिधी:-राहुल राजळे /सोनई)

नेवासा:- महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासकर) यांच्या मार्गदर्शनाखाली व उद्योजक अनिलकुमार गुप्ता यांच्या सहकार्याने सुरेगाव गंगा,नेवासा.बु येथील श्री.सद्गुरू नारायनगिरी आश्रमातील आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नुकतेच ऊबदार कपडे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

नवी दिल्ली येथील आदित्य केअर अँड एज्युकेशन सोसायटी, यांच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविला असून नवी दिल्ली येथील सुप्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक श्री.अनिलकुमार गुप्ता यांच्या सहकार्याने सुरेगाव गंगा (ता.नेवासा) येथील श्री.सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आश्रमातील समस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच स्पोर्ट्स शूज याचाबरोबर थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी ऊबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी बाळासाहेब झिने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या प्रसंगी गुरुवर्य ह.भ.प.महंत उद्धवजी महाराज मंडलिक, (नेवासेकर) यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी गुरुवर्य ह.भ.प.महंत उद्धव महाराज मंडलिक, नेवासेकर, नवी दिल्ली येथे आर टी ओ पदावर असलेले अधिकारी तथा समाज सेवक राकेश कुमार, श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे मा.अध्यक्ष दादासाहेब दरंदले आदीसह प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!