
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
पुणतांबा-भास्कर करिअर अकॅडमीच्या वतीने इयत्ता ११वी, १२वी व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी विशेष मोफत करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत पार पडणार आहे.
या मार्गदर्शन शिबिरासाठी नुकतेच चीफ ऑफिसर म्हणून निवड झालेले श्री. सचिन नामदेव गायकवाड हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांनी महिला व बालविकास संरक्षण अधिकारी (२०२३), मनपा सहाय्यक आयुक्त (२०२४) तसेच MPSC २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्यात २१ वा क्रमांक पटकावला आहे.
शिबिरात इयत्ता ११वी व १२वी नंतर योग्य करिअर कसे निवडावे, स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी नियोजन, सरकारी व खासगी क्षेत्रातील संधी, विद्यार्थ्यांनी स्वतःची तयारी कशी करावी तसेच पालकांची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरे देण्यात येणार आहेत.
हे शिबिर विशेषतः ११वी, १२वी व पदवीधर विद्यार्थी तसेच करिअरविषयी जागरूक पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन, करिअर नियोजनासाठी योग्य दिशा आणि उज्ज्वल भविष्यासाठी ठोस मार्गदर्शन हे या शिबिराचे वैशिष्ट्य आहे.
भास्कर करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष किशोर नवलें (निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले असून इच्छुकांनी नोंदणीसाठी 89565 61515 किंवा 95791 36440 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




