प्रवरा शिक्षण संस्थाशैक्षणिक

प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा इयत्ता बारावीचा शंभर टक्के निकाल! 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – शैक्षणिक वर्ष २०२४-२५ घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लोणी महाविद्यालयाने शंभर निकालाची परंपरा कायम ठेवली असून कु. पवार गायत्री काशिनाथ हिने ८९.६७ गुण मिळवून संस्थेमध्ये प्रथम क्रंमाक मिळवळा तर महाविद्यालयांमध्ये कु.वसुंधरा राम जगताप हिने ८३.५० % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. सूर्यवंशी पूजा बकाराम सुर्यंशी हिने ८१.६७ गुण संपादन करून तृतीय क्रमांक मिळवला आहे. अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या सौ. रेखा रत्नपारखी यांनी दिली. 

 

यशस्वी विद्यार्थिनींचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे पाटील संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील, सहसचिव श्री.भारत घोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे अतांत्रिकचे संचालक डॉ. प्रदिप दिघे ,शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे,प्राचार्या सौ.रेखा रत्नपारखी,उच्च माध्यमिक विभाग प्रमुख सी.पी.तांबे शाळेचे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!