
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – वाकडी गावातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेचे चितळी येथे होणाऱ्या प्रस्तावित स्थलांतराला वाकडी पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे.बँक व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येवून गाव कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे.

या निर्णयाविरोधात (दि. १) सोमवारी संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले वाकडीतील महाराष्ट्र बँकेसमोर ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी, महिला बचत गटाच्या प्रतिनिधींनी गर्दी केली.वाकडीतील बँकेचे स्थलांतर थांबावे अशी एकमताने हाक देण्यात आली.या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांची व व्यवस्थापनाची व्यापक बैठक घेण्यात आली.या बैठकीस बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा डेप्युटी मॅनेजर वर्षा कुल, वाकडी शाखेचे व्यवस्थापक तनपुरे, शाखा अधिकारी रोहन आहिरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी बँक व्यवस्थापनास इशारा देत सांगितले की,येत्या आठ दिवसांत या प्रश्नावर निर्णय होवून तोडगा न निघाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी बँकेवर राहील, असे स्पष्ट केले.

या बैठकीत शेतकरी संघटनेचे विठ्ठलराव शेळके, सरपंच रोहिणी आहेर, अण्णासाहेब कोते, भाऊसाहेब शेळके, वसंतराव लबडे, बापूसाहेब लहारे, सुनील लहारे, सुभाष कापसे, ज्योती शेळके, रवींद्र शेळके, मच्छिंद्र भवार, सुनिता शेळके, संदीप पंत लहारे, आदमने मॅडम, सुनील कुरकुटे, बाबासाहेब शेळके, कापसे ताई, विजय शेळके, मच्छिंद्र खरात आदींसह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी रुपेंद्र काले यांनी शेतकरी संघटनेचे मत मांडले. यावेळी गावातील अनिल शेळके, रमेश लहारे, अमोल शेळके, नितीन येलम, प्रमोद येलम, ज्ञानदेव शेळके, संदीप बळगट, अक्षय साबळे, बंटी गोरे, राजेश शेळके, बी.एम. लहारे, बी.एल. आहेर, महेश एलम, शंकरराव लहारे, सावळेराम आहेर, प्रमोद एलम, नारायण शेळके, आनंद आहेर, तात्यासाहेब गोरे, अनिल पांडागळे, दिलीप लहारे, गंगाधर नारंगिरे, अॅड. अतुल लहारे, दिंगबर कोते आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत बँक मॅनेजर तनपुरे आणि डेप्युटी मॅनेजर वर्षा कुल यांनी बँकेच्या धोरणांबाबत माहिती देताना सांगितले की, “ग्रामस्थांच्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील.” मात्र, ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले की वाकडीतील बँक शाखा कुठल्याही परिस्थितीत स्थलांतर होऊ नये.”शाखा स्थलांतर झाल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू.” असे ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.




