Warning: Undefined array key "fourth-footer-widget-area_2" in /home/u581513462/domains/ahilyanagarkhabarbaat.com/public_html/wp-content/plugins/ad-inserter/settings.php on line 4104

Warning: Trying to access array offset on null in /home/u581513462/domains/ahilyanagarkhabarbaat.com/public_html/wp-content/plugins/ad-inserter/settings.php on line 4104
प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज येथे गुरुवारी आंतरराष्ट्रीय पातळीवरील शोध निबंध व स्टार्टअप परिषदेचे आयोजन – ahilyanagarkhabarbaat.com
प्रवरा शिक्षण संस्था

प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज येथे गुरुवारी आंतरराष्ट्रीय पातळीवरील शोध निबंध व स्टार्टअप परिषदेचे आयोजन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे अंतर्गत प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज, लोणी येथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील शोधनिबंध परिषद आणि स्टार्टअप इनोव्हेशन कोन्क्लेव्ह १२ आणि १३ जून २०२५ रोजी इन्स्पायर भारत या संकल्पनेतून थिंक ग्लोबल अॅट लोकल या पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या तत्त्वानुसार आत्मनिर्भर भारत विकसित भारत या दृष्टीने या आंतरराष्ट्रीय परिषदेचे चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सॉफ्टवेअर, हार्डवेअर कोर इंजिनिअरिंग, सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच मल्टी डिसिप्लिनरी मध्ये मेडिकल टेक्नॉलॉजी फार्मसी बायोटेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी अशा विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये शोधनिबंधामध्ये आणि स्टार्ट अपचा सहभाग असणार आहे. अशी माहीती प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाने यांनी दिली. 

 

गुरुवार दि.१२ जुन २०२५ रोजी जलसंपदा मंञी तथा अहील्यानगरचे पालमंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील, विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी चे कुलगुरू डाॅ. विद्याशंकर एस., महाराष्ट्र शासनाच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग टेक्नॉलॉजीकल यूनिवर्सिटी पुणे चे कुलगुरू डाॅ.सुनिल भिरुड, महात्मा गांधी मिशन या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डाॅ. विलास सपकाळ, आऊटस्टँडिंग सायंटिस्ट डाॅ.आर.एस. शिंदे, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुस्मिता विखे पाटील, आणि इतर उद्योग व्यवसायातील नामवंत सहभागी होणार आहेत. तसेच डेव्हलपमेंट पेटंट यासंबंधी उद्देश ठेवून परिषदेत चर्चा होणार आहे. असे प्रवरा प्रिझमचे संचालक डाॅ.संजय कुरकुटे यांनी सांगितले. 

 

जागतिक पातळीवर होणारी ही परिषद खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करणारे ठरणार आहे आणि या माध्यमातून या जागतिक परिषदेमध्ये विविध परिसंवाद चर्चासत्र होणार आहे. या चर्चा सञासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर परिसरातील विद्यार्थी, संशोधक ,महिला बचत गट त्याचबरोबर या परिषदेसाठी राज्यातून देशभरातून आणि परदेशातून विविध शोध निबंध सादर करण्यात येणार आहे. या परिषदेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. संजय कुरकुटे यांनी केले आहे. 

 

 

  ग्रामीण भागात होणारी ही परिषद आगळीवेगळी ठरावी यासाठी संस्थेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न सुरू आहे. यासाठी देशातील विविध संशोधकांनी आणि टेक्सास युनिव्हर्सिटी , इंडोनेशिया आणि मलेशिया युनिव्हर्सिटी यामध्ये सहभाग घेत शोधनिबंध परिषदेकडे पाठवले झाले आहेत. 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!