Uncategorized

चितळी-राहाता रस्त्यावरील रामपूरवाडी फाट्या नजीक आढळला अज्ञात वयोवृद्ध इसमाचा मृतदेह

आळंदी ओढ्या नजीक दोन ते अडीच महिन्यापूर्वी आणून सोडलेला वयोवृद्ध इसम भिक्षेकरू असल्याचा संशय

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – चितळी रस्त्यावरील रामपूरवाडी फाटा परिसरातील आळंदी ओढ्या नजीक रस्त्याच्या कडेला सत्तर वर्षीय वयोवृद्ध अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.याप्रकरणी श्रीरामपूर तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये रजिस्टर नंबर १२/२०२५ बी. एन. एस. एस.१९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

 

 

सविस्तर घडलेली हकीगत अशी की,राहाता-चितळी रस्त्यालगत असलेल्या आळंदी ओढा या ठिकाणी अंदाजे ७० वर्षे वयाचावयोवृद्ध इसम मृत अवस्थेत सापडला असल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून पोलीस प्रसासनाला देण्यात आली.वयोवृद्ध इसम कुठल्याही प्रकारची हालचाल करीत नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.या गोष्टीमुळे त्यांचा आणखीनच संशय वाढला.घटनास्थळावरून तात्काळ श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला घटनेबाबत पोलीस प्रशासनाला माहिती देवून सूचित करण्यात आले.यावेळी श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार एस. एस.घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचनामा केला.यावेळी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली.

 

 

यावेळी वाकडीचे सरपंच बाबासाहेब आहेर,रामपूरवाडीचे सरपंच संदीप सुरडकर छावा बिग्रेडचे संस्थापक विश्वनाथ वाघ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाउपाध्यक्ष योगेश बनसोडे, पोलीस पाटील अभंग यांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेवून इसमाची पाहणी केली.त्यानंतर खाजगी ॲम्बुलन्सला पाचारण करण्यात आले.सदर अज्ञात इसमाला साखर कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर या ठिकाणी तात्काळ हलविण्यात आले.यावेळी साखर कामगार हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी अज्ञात वयोवृद्ध इसमाची आरोग्य तपासणी केली.परंतु; सदर इसमाचा प्राथमिक उपचाराच्या आधीच मृत्यू झाला असल्याची माहिती साखर कामगार हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पोलीस प्रशासनाला दिली.पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला पोलीस प्रशासनाला माहिती देणाऱ्या नागरिकांचे जबाब नोंदविण्यात आले.त्यानंतर सदर अज्ञात इसमाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तीन दिवस सदर वयोवृद्ध इसमाचा मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी साखर कामगार हॉस्पिटल च्या शवागारात ठेवण्यात आला असल्याची माहिती तपासी अंमलदार राजेंद्र लवांडे यांनी माध्यमांना दिली आहे.

 

 

  • मागील दोन ते अडीच महिन्यापासून एक अज्ञात वयोवृद्ध इसम रस्त्याच्या कडेला वास्तव्यास होता.दरम्यान या अज्ञात इसमाला दोन ते अडीच महिन्यापूर्वी रामपूर फाटा परिसतील आळंदी ओढ्या नजीक कोणीतरी आणून सोडले आहे अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली. या इसमाला बोलता येत नव्हते.
  • वाकडी रामपूरवाडी व आसपासच्या परिसरातील नागरिक त्या इसमाला खाण्यापिण्याचे साहित्य पुरवत होते.याचबरोबर खाजगी अथवा शासकीय वृद्धाश्रम तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आश्रमात भरती करण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु;अनेक सामाजिक संस्थांनी सदर व्यक्तीचे वय जास्त असल्याचे कारण सांगून आश्रमात भरती करण्यास टाळाटाळ केली.सदर रस्त्याच्या कडेला असल्याने जड व भरधाव वाहतुकीमुळे इसमाच्या जीवास धोका तर होताच.

 

  • तरीही मध्यंतरी दोन ते अडीच महिन्यापासुन भर थंडीच्या तडाख्यात अज्ञात वयोवृद्ध इसम रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत होता.व त्यानंतर उन्हाचाही तडाखा जास्त झाल्याने वयोवृद्ध इसमाची अवस्था अजूनही बिकट झाली. यादरम्यान अनेक जबाबदार नागरिकांनी शासकीय वृद्ध आश्रमांना व सामाजिक संस्थांना या इसमाची मदत करण्याचे आवाहन केले. होते

 

  • ‘शासकीय वृद्ध आश्रमे व सामाजिक संस्था फक्त नावापुरत्याच??
  • स्वतःचा मोठा गाजावाजा करणाऱ्या अनेक नामवंत शासकीय तथा खाजगी सामाजिक संस्थांनी कुठले ना कुठले कारण देवून सदर इसमाची मदत करण्याचे टाळले.परिणामी सदर अज्ञात वयोवृद्ध इसम रस्त्याच्या कडेलाच मृत झालेल्या अवस्थेत आढळून आला.स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या एकाही सामाजिक संस्थेच्या वृद्धआश्रमाने त्या वयोवृद्ध इसमाला मदतीचा हात दिला नाही.ही खरी शोकांतिका आहे.मयत इसम नेमकी कुठला? आळंदी ओढ्यानजीक अज्ञात वयोवृद्धास कोणी आणून सोडले. मृत्यू कुठल्या कारणाने झाला? असे तर तर्कवितर्क सवाल नागरिकांनी उपस्थित केले आहे.पोलीस प्रशासनाने घटनेचा सखोल तपास करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

 

अज्ञात वयोवृद्ध इसमाचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी साखर कामगार हॉस्पिटलच्या शवागारात पुढील तीन दिवसाठी मृतदेह ठेवण्यात आला आहे.नागरिकांना अज्ञात इसमाच्या बद्दल कुठलीही माहिती मिळाल्यास पोलीस प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करावे मदतीस इसमाच्या बाबतीत कुठलीही माहिती मिळाल्यास श्रीरामपूर तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

:- राजेंद्र लवांडे,तपासी अंमलदार

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!