महाराष्ट्र

युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न

संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून पशू पक्षांसाठी अन्न पाण्याची सोय 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. संजीवनी प्रतिष्ठानच्या युवा सेवकांच्या माध्यमातून कोपरगाव शहरात भीषण पडलेल्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची तर पक्षांसाठी बर्ड्स वॉटर फीडरची व्यवस्था करून देण्यात आली असून कोपरगावकरांनी या कौतुकास्पद उपक्रमाचे स्वागत केले आहे.

स्व.शंकरराव कोल्हे यांच्या सेवा हाच धर्म या शिकवणीचा आदर्श घेऊन युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्दर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानचे समस्त युवा सेवक मागील अकरा वर्षांपासून कोपरगाव शहरासह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. सोमवार (दि.२७) एप्रिल रोजी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरांत मुक्या जनावरांना पाण्याची तर पक्ष्यांसाठी बर्ड्स फीडर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

सध्या सर्वत्र 40 ते 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमानाची वाढ झाल्याने मुक्या जनावरांसाठी पाण्याची गरज अधिक अधोरेखित झाली आहे.नागरिकांसोबतच मुक्या प्राण्यांनाही उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील विविध भागांत जनावरांसाठी पाण्याची तसेच पक्ष्यांसाठी फीडर्सची सोय करण्यात आली आहे.कोपरगाव शहरात भटक्या व मुक्या जनावरांची संख्या मोठी असल्याने उन्हाळ्यात त्यांना पाण्याची कमतरता भासते. तसेच तीव्र उष्णतेमुळे पक्ष्यांनाही अन्न-पाण्याचा तुटवडा जाणवतो. या पार्श्वभूमीवर पक्ष्यांना दाणे व पाणी उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त ही संकल्पना युवा सेवकांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविण्यात आली आहे.

 

या उपक्रमांतर्गत शहरात सुमारे 100 ठिकाणी बर्ड्स फीडर्स बसविण्यात आले असून ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात मुक्या जनावरांना पाणी तर पक्षांसाठी अन्न उपलब्ध होणार आहे. तसेच पक्षांसाठी लावण्यात आलेल्या फीडर्सची देखभाल करण्याची जबाबदारी शहरातील व्यापारी व नागरिकांनी स्वीकारली असून ते नियमितपणे पाणी व अन्न उपलब्ध करून देणार आहेत.या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला असून नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत विवेकभैय्या कोल्हे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी कोपरगाव शहरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!